Tarun Bharat

जगातील सर्वात कमी वयाची लेखिका

Advertisements

वयाच्या 5 व्या वर्षीच लिहिले पुस्तक

स्वतःचे कौशल्य दाखविण्यासाठी कुठल्याही वयाचे बंधन नसते. एक छोटे मूल देखील स्वतःच्या कौशल्याद्वारे जगाला थक्क करू शकतो. कमी वयातच मुलं गीत-संगती, अभिनय, नृत्यकला, लेखन इत्यादी क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. आता याच यादीत आणखीन एका मुलीचे नाव जोडले गेले आहे. या मुलीने एका अशा क्षेत्राची निवड केली आहे, ज्याकरता प्रचंड अभ्यास आणि अनुभवाची गरज असल्याचे मानले जाते. या मुलीने कमी वयात या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करून दाखविली आहे.

या मुलीने वयाच्या 5 व्या वर्षीच पुस्तक लिहून लेखनाच्या क्षेत्रात स्वतःचे पहिले पाऊल ठेवले आहे. पुस्तक लेखनासाठी मोठे शिक्षण आणि अनुभवाची नव्हे तर कल्पना आणि दृष्टीकोनाची गरज असत हे दाखवून दिले आहे.

या मुलीचे नाव बेला जे डार्क असून तिने किंडरगार्टेनमध्ये शिकताना जगातील सर्वात कमी वयाची लेखिका होण्याचा मान मिळविला आहे. बेलाने मागील वर्षीच एक पुस्तक लिहले आणि याविषयी स्वतःच्या आईवडिलांना सांगितले. परंतु प्रारंभी तिच्या आईवडिलांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु बेलाने लिहिलेले पुस्तक पाहिल्यावर मुलीचा दृष्टीकोन पाहून ते दंग झाले.

बेलाची प्रतिभा पाहून आई चेल्सी सायमे आणि वडिल माइल्स डार्क यांना अभिमान वाटत आहे. बेलाच्या कहाणीद्वारे बरेच काही शिकता येते. बेलाने लिहिलेली कथा ही एका हरवलेल्या मांजराची होती. या पुस्तकाचे नाव ‘द लॉस्ट कॅट’ आहे.

मांजर स्वतःच्या आईशिवाय बाहेर पडते आणि हरवून बसते असे कहाणीत मांडले गेले आहे. कहाणी अत्यंत भावुक करणारी आहे, कारण यात जीवनात आईचे महत्त्व काय असते हे शब्दांद्वारे व्यक्त करण्यात आले आहे. जिंजर फायरे प्रेसकडून तिचे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकातील सर्व चित्रे बेलानेच रेखाटली आहेत.

Related Stories

जगातील सर्वात उंच श्वान

Patil_p

स्मरणशक्ती वाढविणारे हेल्मेट

Amit Kulkarni

कचऱयाला कलाकृतीत बदलणारी महिला

Patil_p

दिवसात केवळ अर्धा तास झोप

Patil_p

जगातील सर्वात महाग कलिंगड

Patil_p

पुणे : मंडई गणपतीची यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना

Rohan_P
error: Content is protected !!