Tarun Bharat

जगातील सर्वात मोठा ट्रक

युएईतील रेनबो शेख यांच्या संग्रहात सामील

सर्वसाधारणपणे ट्रकचा विचार केल्यास चारचाकी वाहनच आठवते, जे मोठय़ा प्रमाणात माल दीर्घ अंतरापर्यंत वाहून नेऊ शवपे. पण जगातील सर्वात मोठा पिकअप ट्रक कुठला हे बहुतांश लोकांना माहित नसावे. संयुक्त अरब अमिरातच्या वाळवंटात फिरणारा विशेषकरून डॉज पॉवर व्हॅगनप्रमाणे डिझइन करण्यात आला आहे. युएईतील रेनबो शेख यांनी स्वतःच्या विशेष कलेक्शनसाठी हा ट्रक तयार करवून घेतला आहे. हा ट्रक जगातील सर्वात मोठा ट्रक असल्याचे मानण्यात येते.

हा ट्रक क्लासिक डॉज पॉवर व्हॅगनच्या मूळ आकारापेक्षा 8 पट अधिक मोठा आहे. या ट्रकचे वजन 50 टन इतके आहे. यात एक किचन, लिव्हिंग रुम आणि बाथरुम देखील आहे. हा ट्रक केवळ केवळ म्युझियमसाठी तयार केल्याचे अनेक लोकांना वाटत होते. पण हा ट्रक प्रथम म्युझियमबाहेर तयार करण्यात आला आणि त्यानंतर मो म्युझियममध्ये आणला गेला आहे. हा ट्रक केवळ म्युझियमचा हिस्सा असून अबुधाबीच्या रस्त्यांवर धावण्यासाठी नोंदणीकृत देखील आहे. या ट्रकच्या निर्मितीसाठी काही महिनेच लागले आहेत.

1950 च्या डॉज पॉवर व्हॅगन पिकअप ट्रकवर आधारित हा ट्रक रेनबो शेख म्हणजेच शेख हमद बिन हमदान अल नायेन यांचा आहे. त्यांच्याकडे अबुधाबीत अमिरात नॅशनल ऑटो म्युझियममध्ये 200 कार्सचा संग्रह आहे. रेनबो शेख हे युएईतील सत्तारुढ परिवाराचे सदस्य आहेत. त्यांना स्वतःच्या अनोख्या छंदासाठी विशेषरित्या ओळखले जाते. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणे ते पसंत करतात.

डॉज पॉवर व्हॅगन चारचाकी मीडियम डय़ुटी ट्रक आहे. 1945 ते 1980 पर्यंत डॉज कंपनी याची निर्मिती करत होती. प्रारंभी सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी याची निर्मीत केली जायची. याचे अनेक मॉडेल्स लोकप्रिय झाले आहेत.  रेनबो शेख यांनी 1950 चे मॉडेल निवडले, कारण 1950 च्या दशकात मोठय़ा तेलव्यापाऱयांकडून वापरात आणल्या जाणाऱया वाहनांपैकी ते एक होते.

रेनबो शेख यांच्या या ट्रकला आज जगातील सर्वात मोठय़ा ट्रक्सपैकी एक मानले जाते. याच्या पुढील लाइटचीच किंमत सुमारे 1390 डॉलर्स आहे. मूळ डॉज पॉवर व्हॅगनमध्ये 6 सिलिंडरचे 300 बीपीएचचे इंजिन आहे.

Related Stories

विवाहासाठी दुसऱयाच्या पत्नीला चोरण्याची प्रथा

Patil_p

प्रिन्स फिलीप यांच्यावर आज अंत्यसंस्कार

datta jadhav

चीनमधील मानवाधिकाराबद्दल संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता

Amit Kulkarni

रशियाची कोरोना लस 15 ऑगस्टपर्यंत येणार

Patil_p

इंडोनेशियात चीनची लस

Patil_p

बांगलादेशात नौका बुडाल्याने 24 ठार

Patil_p