Tarun Bharat

जगातील सर्वात मोठा भोपळा

Advertisements

युरोपचा चॅम्पियन 1200 किलोंहून अधिक वजनी

जगातील विविध देशांमध्ये अजब स्पर्धांचे आयोजन होत असते. युरोपमध्य भोपळय़ाच्या विविध प्रकारांचा उत्सव साजरा करण्यासाठी युरोपियन पम्पकिन वेईंग चॅम्पियनशिपचे आयोजन ऑक्टोबरमध्ये करण्यात येतेत. या भोपळय़ाचे जगातील सर्वात अनोखे प्रकार दिसून येतात.

यंदाच्या स्पर्धेत इटलीच्या टस्कनी क्षेत्रातील भोपळा विजेता ठरला आहे. याचे वजन 1,217.5 किलोग्रॅम इतके होते. या विशाल भोपळय़ाने जर्मनीच्या लुडविग्सबर्गमध्ये आयोजित युरोपियन पम्पकिन वेइंग चॅम्पियनशिप जिंकली आहे.

सोशल मीडियावर या भोपळय़ाप्रकरणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. या क्षेत्रात हॅलोवीन खरोखरच भयानक असावे असे एका युजरने म्हटले आहे. 31 ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱया हॅलोवीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर भोपळय़ाचा वापर केला जातो.

या भोपळय़ाद्वारे भरपूर कन्फेक्शनरी सिरप आणि बरेच काही तयार केले जाऊ शकते असे एका युजरने नमूद केले आहे. इटलीतील काही सेशल मीडिया युजर्सनी देशाची कामगिरी मांडण्याचा प्रकार केला आहे. यात युरो कप 2020 पासून ऑलिम्पिक पदके आणि युरोपियन पम्पकिन वेइंग चॅम्पियनशिपलाही सामील केले आहे.

Related Stories

U-19 विश्वचषक : पाकिस्तानला नमवून भारत अंतिम फेरीत

prashant_c

ट्रम्प दौऱयापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले

tarunbharat

कधीच पूर्ण न झालेला 4 अब्जाचा महाल

Patil_p

मास्क लावायला सांगितलं म्हणून…

Amit Kulkarni

पाकिस्तानी अर्थमंत्री दहशतवाद्यांकडून वेठीस

Patil_p

हिंदूंचे बळजबरीचे धर्मांतर सुरूच : पाक संसद

Patil_p
error: Content is protected !!