Tarun Bharat

जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये सावित्री जिंदाल 6 व्या स्थानावर; जाणून घ्या सर्वात श्रीमंत महिला आणि त्यांच्या कंपन्या

फोर्ब्स इंडियाने नुकतीच २०२२ साठी भारतीय श्रीमंतांची यादी जाहीर केली. या वर्षी नऊ भारतीय महिलांनी जागतिक श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले. फोर्ब्सच्या यादीत नमूद केलेल्या जागतिक यादीत महिला अब्जाधीश मोठ्या प्रमाणात उत्पादन उद्योगातील होत्या. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल या एकमेव महिला अब्जाधीश आणि सक्रिय राजकारणी फोर्ब्सच्या टॉप 10 यादीत सहाव्या स्थानावर आहेत तर Nykaa च्या फाल्गुनी नायर 44 व्या स्थानावर आहेत.

सावित्री जिंदाल : १ लाख ३२ हजार चारशे कोटी रुपयांचा संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिला असा बहूमान पटकावला आहे. त्या ओ.पी. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन असून एमेरिटस आणि फोर्ब्सच्या टॉप 10 यादीतील एकमेव भारतीय महिला अब्जाधीश आहेत. याचबरोबर त्या राजकारणातही सक्रिय आहेत.

रेखा झुनझुनवाला : त्या दिवंगत स्टॉक मार्केट किंग राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी असलेल्या रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर आहे. त्या भारतातील 30 व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

फाल्गुनी नायर : Nykaa या महिलाच्या कपड्यांच्या ब्रँडच्या संस्थापक आणि CEO असलेल्या फाल्गुनी नायर ह्या 44 व्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती 4.8 अब्ज डॉलर आहे.

दिव्या गोकुलनाथ : त्या Byju या शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीच्या सह-संस्थापक आणि संचालक असलेल्या दिव्या गोकुलनाथ यांची एकूण संपत्ती 3.6 अब्ज डॉलर इतकी आहे.

मल्लिका श्रीनिवासन : ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड (Taffe) जगप्रसिद्ध ट्रॅक्रर कंपनीच्या मालकिण, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मल्लिका श्रीनिवासन यांची संपत्ती 3.4 अब्ज डॉलर अहे. तसेच त्या भारत सरकारने स्थापन केलेल्या सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्षा आहेत. तिची एकूण संपत्ती $3.4 अब्ज आहे.

Related Stories

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले लॉक डाऊन वाढवण्याचे संकेत

prashant_c

समृद्ध आरोग्य यंत्रणा उभी करणे ही प्राथमिकता : राजेश टोपे

Tousif Mujawar

एनडीटीव्हीच्या पदाधिकाऱयांचे राजीनामे

Patil_p

युवकाच्या कानशिलात लगावणाऱया जिल्हाधिकाऱयाला हटविले

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

Patil_p

हरवलेल्या पुत्राची मातृदिनी भेट

Patil_p