Tarun Bharat

जगातील सर्वात स्वस्त डाटा भारतामध्ये

Advertisements

1 जीबी डाटासाठी फक्त 6.75 रुपये : व्हिज्युअल कॅपेलिस्ट अहवालामधून स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

जगाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मोबाईल डाटा भारतात मिळत आहे. 1 जीबी डाटासाठी साधारण 6.75 रुपये द्यावे लागतात, अशी माहिती व्हिज्युअल कॅपेलिस्टच्या अहवालामधून देण्यात आली आहे. सर्वाधिक महाग मोबाईल डाटा हा मालवी येथे मिळत आहे. या ठिकाणी 1 जीबी डाटासाठी जवळपास 2,053 रुपये मोजावे लागतात. 155 विविध देशांमध्ये मोबाईल डाटाच्या किंमतीचे आकडे  केबल डॉटकोडॉटयुके यांच्याकडून जमा केले आहेत.

मोबाईल डाटा उपलब्ध करण्यासाठी कंपन्या आवश्यक ती यंत्रणा व्यवस्थित राबवत असताना दिसते आहे. यामध्ये प्रथम नेटवर्कची उभारणी व अन्य साधनसामुग्रीची व्यवस्था सेवेत महत्त्वाचे योगदान देत असते.अन्य गोष्टींमध्ये डाटाची किमत आणि ग्राहकांचे उत्पन्न यावर 1 जीबी डाटा किती किमतीला विक्री करावा हे निश्चित केले जात असल्याचे उपलब्ध अहवालामधून सांगितले आहे.

Related Stories

एप्रिलमध्ये 15,905 कंपन्यांची नोंदणी

Patil_p

11 महिन्यात भारताच्या पाम तेलाच्या आयातीत 2.7 पट वाढ

Patil_p

एअर इंडियाच्या सीईओपदी कॅम्बेल विल्सन

Amit Kulkarni

बाजार भांडवलाच्या यादीत भारत सहावा

Patil_p

सप्टेंबरमध्ये भरतीत 24 टक्के वाढ

Omkar B

आयटीआर भरल्यानंतर व्हेरिफिकेशन करणे आवश्यक

Patil_p
error: Content is protected !!