Tarun Bharat

जगातील 100 कंपन्यांच्या सूचीत रिलायन्सची झेप

Advertisements

2012 नंतर पुन्हा पहिल्या शंभरमध्ये : फॉर्च्यून पत्रिकेच्या अहवालामधून माहिती सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अब्जपती व्यावसायिक अशी ओळख असणाऱया मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात  उभारी घेत असणाऱया रिलायन्स इंडस्ट्रीजेन 10 स्थानी स्थानी पटकावत फॉर्च्यून ग्लोबलच्या 500 कंपन्यांमध्ये मुख्य 100 कंपन्यांच्या सूचीत आपली झेप घेतली आहे. अशी माहिती फॉर्च्यून पत्रिकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालामधून सांगितले आहे.

तेल, पेट्रोलियम, किरकोळ आणि दूरसंचारसारख्या क्षेत्रात काम करत असणारी रिलायन्सला फॉर्च्यूनची 2020 च्या जागतिक कंपन्यांच्या यादीत 96 वे स्थान मिळविले आहे. फॉर्च्यूनची मुख्य 100 कंपन्याच्या यादीत फक्त रिलायन्स ही भारतामधील एकमेव कंपनी समावि÷ झाली आहे.

या अगोदर रिलायन्स या सूचीत 2012 मध्ये 99 व्या स्थानी राहिली होती. परंतु त्याच्यानंतर कंपनीचे स्थान घसरत 2016 पर्यंत 215 व्या स्थानी पोहोचले होते. त्याच्यानंतर सलग रिलायन्सने आपल्या रॅकिंगमध्ये सुधारणा करीत आणली आहे.

देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेचे  रॅकिंगमध्ये 15 अंकानी सुधारणा होत ती सध्या 221 व्या स्थानावर आली आहे. सदर सूचीमध्ये असणाऱया अन भारतीय कंपन्यांमध्ये भारत पेट्रोलियम 309, टाटा मोटर्स 337 आणि राजेश एक्स्पोर्ट 462 व्या रॅकिंगवर आली आहेत.

Related Stories

भारतीय शेअर बाजाराची नव्या उंचीवर झेप

Amit Kulkarni

मुथूट फायनान्सला 150 नव्या शाखा उघडण्यासाठी आरबीआयची मान्यता

Patil_p

‘फ्लिपकार्ट’चे आता लहान शहरांमधील व्यवसायावर लक्ष्य

Patil_p

फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख अंखी दास यांचा राजीनामा

Omkar B

घसरणीला विराम : सेन्सेक्स 887 अंकांनी मजबूत

Patil_p

बाजारात सेन्सेक्सची 50 हजारकडे वाटचाल

Patil_p
error: Content is protected !!