Tarun Bharat

डास पाळणारी प्रयोगशाळा

जगात सर्वाधिक प्रमाणात असणारा आजार म्हणजे मलेरिया होय, असे संशोधकांचे म्हणणे आहे. मलेरिया संपविण्यासाठी गेल्या दीडशे वर्षांहून अधिक काळ प्रयोग होत आहेत. छत्तीसगढमधील रायपूर येथील लालपूर विभागात आयसीएमआरशी संलग्न नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मलेरिया रिसर्च ही भारतातील मलेरियाची संशोधन करणारी सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत चक्क डास पाळले जातात आणि त्यांचे पुनरुत्पादनही केले जाते.

डासांच्या अनेक प्रजाती या प्रयोगशाळेत पाळण्यात आलेल्या आहेत. कोणत्या स्थितीत डासांपासून मलेरियाचा प्रसार होतो, याचा अभ्यास केला जात आहे. मलेरिया आटोक्मयात आणण्यासाठी डासांची संख्या कमी ठेवणे आवश्यक असते. आपण आपल्या घरातही डास कमीत कमी रहावेत किंवा राहूच नयेत यासाठी प्रयत्नशील असतो. तथापि, या प्रयोगशाळेत डासांचे महत्त्व सर्वाधिक असल्याने येथे डास मारण्याऐवजी संवर्धित केले जातात. मलेरियावरील विविध औषधे, डास मारणारी विविध रसायने व इतर उपायांचा अभ्यास या डासांवर केला जातो. या प्रयोगशाळेत डास हे प्रत्यक्ष उडणारे डास आणि डासांच्या अळय़ा अशा दोन्ही स्वरुपात पाळले जातात. जगात आढळणाऱया सर्व प्रकारांच्या डासांची येथे पैदास केली जाते. डासांचा जन्म सुलभरीत्या व्हावा यासाठी येथे पाण्याचे मोठमोठे हौद आहेत. तसेच डासांना खुराक मिळावा म्हणून सशाच्या रक्ताचा उपयोग केला जातो. यासाठी ससे आसपासच्या ग्रामस्थांकडून भाडोत्री घेतले जातात.

Advertisements

Related Stories

2 वर्षांच्या मुलीचा आयक्यू थक्क करणारा

Patil_p

अमेरिकेत 20 हजार नवे

Patil_p

‘आम्ही शस्त्रे ठेवणार नाही, आमची शस्त्रे हेच आमचे सत्य आहेत’ : झेलेन्स्की

Sumit Tambekar

युक्रेनमधून 9 बांग्लादेशींची सुटका; शेख हसीना यांनी मानले मोदींचे आभार

datta jadhav

पाण्यासाठी पाकची भारताकडे याचना

Patil_p

”रशियासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर बायडेन नाराज”

Sumit Tambekar
error: Content is protected !!