Tarun Bharat

जतमध्ये “पहिल्या, माडग्याळ मेंढी यात्रेला” सुरुवात

आम. विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

जत / प्रतिनिधी

जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या माडग्याळ मेंढीचे जन्मस्थान जत तालुक्यात आहे. त्यामुळे या मेंढ्यांच्या मायभूमीत, पहिल्या माडग्याळ मेंढी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जत येथील जनावरांच्या बाजारात 30 ते 31 डिसेंबर अखेर ही यात्रा भरविण्यात आली आहे. यात्रेचे उद्घाटन आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तर मेंढ्यांचे पूजन, मेंढपाळ समाजाचे नेते अशोक बन्नेनवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य – महादेव पाटील, यात्रेचे संयोजक आणि मेंढपाळ समाजाचे नेते दादासो तांबे, सुभाष पाटील, प्रकाश मोटे, दिलीप घाडगे, महेश हावगुंडे, पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, सामाजिक कार्यकर्ते सलीम पाच्छापुरे, सुभाष हाक्के, बिराप्पा शिंदे, महाराजा यशवंतराव होळकर ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अमोल पांढरे, विक्रम ढोणे, विलास काळे, तायाप्पा वाघमोडे, तेजस्विनी व्हनमाने आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, आमदार विक्रम सावंत यांनी माडग्याळ मेंढीच्या भौगोलिक उगमस्थानाचा प्रश्न उपस्थित केला. तसेच माडग्याळ मेंढीचे उगमस्थान हे कुलाळवाडी / सिद्धनाथ आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव आपण संबंधित विभागाकडे सादर केला आहे. तसेच या विषयावरती विधानसभेतही आवाज उठवणार असून, हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला जाईल. आणि तालुक्यातील मेंढपाळ बांधवांना योग्य तो न्याय दिला जाईल असे सांगितले. त्याशिवाय शेतीला जोडधंदा म्हणून मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाय योजना आखल्या जातील. मेंढपाळांचे आणि त्यांच्या मुलाबाळांचे प्रश्न सोडवण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी संयोजकांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले.

Related Stories

जगभरातील कोरोनाबाधितांनी ओलांडला 80 लाखाचा टप्पा

datta jadhav

ऑपरेशन कमळ : येडियुराप्पांच्या चौकशीला संमती

Amit Kulkarni

श्रीनगरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांचा हल्ला

Archana Banage

लोकराजा शाहू महाराज कृतज्ञता पर्वासाठी राज्य शासनाकडून ५ कोटी रुपये

Archana Banage

सातारा जिल्ह्यात ५१ कोरोनाबाधित रुग्णांची भर

Archana Banage

कर्नाटकात आतापर्यंत २८ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage