Tarun Bharat

जतमध्ये बंधाऱ्यात बुडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू

प्रतिनिधी/जत

जत शहरातील उमराणी रोडवर असणाऱ्या पारधी तांडा येथील चौदा वर्षीय बालकाचा ओढा पात्रावर असणाऱ्या बंधाऱ्यात पडून मृत्यू झाला. सनी सुरेश काळे असे मयत मुलाचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

सनी हा सायंकाळी आपल्या घरापासुन काही अंतरावर असलेल्या पाटील मळ्या जवळील ओढा पात्राच्या बंधाऱ्याच्या पाण्यात खेळत होता. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, शिवाय पोहताही येत नव्हते, खेळण्याच्या नादात तो खोल पाण्यात गेल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना त्याच्या भावास लक्षात येताच त्याने आरडाओरडा केला. घरातील लोक येऊन त्यास बाहेर काढे पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इरकर यांनी जत पोलिसात माहिती दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कणसे करत आहेत.

Related Stories

कोरोना विरूध्दच्या लढ्यासाठी कोरोना कमांडो प्रशिक्षण स्तुत्य उपक्रम

Archana Banage

‘तळीये’च्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्विकारली

datta jadhav

मिरजेतील डॉक्टराला कोरोनाची लागण

Archana Banage

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अजित पवारांचा दौरा

datta jadhav

बार्शी तहसील कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

Archana Banage

”राज्यशासनाकडे कारखाने वाचवण्यास पैसे आहेत, मग पूरग्रस्तांसाठी का नाहीत ?”

Archana Banage