प्रतिनिधी / जत
जत येथील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीची भरपाई मिळण्यासाठी प्राताधिकारी कार्यालयात सादर केलेली फाईल मंजुर करून देतो म्हणून तब्बल 25 हजार लाचेची मागणी करणारा आववल कारकूनास सोमवारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडली श्रीकांत कृष्णा चंदनशिवे वय 46 राहणार आंबेडकर नगर कवठेमहांकाळ असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव आहे. या सर्व कारवाहीमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, तालुक्यातील वाशान गावापासून म्हैसाळ सिंचनाचा जत मुख्य कालवा गेला आहे, याच गावातील एका शेतकऱ्याची जिरायत जमीन कालवा कामासाठी अधिग्रहित केली आहे, पण या शेतकऱ्याला अद्याप त्या जमिनीचा आर्थिक मोबदला मिळाला नाही, या कामाची फाईल त्यांनी प्रांत कार्यालयात सादर केली आहे, वारंवार पाठपुरावा करूनही या कार्यालयातुन त्यांच्या कामाची फाईल हालत न्हवती, शिवाय ही फाईल मंजूर करून देणे व जमिनाचा मोबदला मिळवून देण्यासाठी उप विभागीय कार्यालयातील अव्वल कारकून श्रीकांत चंदनशिवे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे 25 हजाराची लाच मागितली होती.
हक्काच्या कामासाठी कारकून लाच मागत असल्याने संबंधित शेतकऱ्यांने सांगलीच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती, या तक्रारीची गंभीर दखल घेत, लाचलुचपत विभागाने गोपनीय पडताळणी केली, अधिकारी लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी जतच्या प्रांत कार्यालयात सापळा लावला होता, अव्वल कारकून श्रीकांत चंदनशिवे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे 25 हजार मागितले होते, त्यापैकी 20 हजार रक्कम देण्याचे ठरले, त्यानुसार सोमवारी कारकून चंदनशिवे हा 20 हजार रुपये घेत असताना लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई अप्पर उपायुक्त राजेश बनसोडे व पोलीस अधीक्षक शुंष्मा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सुजय घाटगे, गुरुदत्त मोरे, अविनाश सागर, सुहेल मुल्ला, संजय संकपाळ, सलीम मकांदार, धनंजय खाडे, सीमा माने, विना जाधव, बाळासाहेब पवार यांनी केली.


previous post