Tarun Bharat

जत जवळ चारचाकी पलटी; दोन ठार

प्रतिनिधी / जत

रेवनाळ ता.जत हून जतकडे येत असताना कुत्रे आडवें आल्याने चारचाकी गाडी पलटी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्तात्रय जगन्नाथ धायगुडे (वय 40) व सुरेश तुकाराम पुजारी (वय 33, दोघे रा.रेवनाळ, ता.जत) असे मृत व्यक्तींची नावे असून शुक्रवारी दि.17 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत दत्तात्रय धायगुडे व सुरेश तुकाराम पुजारी यांच्या सह चौघे रेवनाळ येथून जेवण करून जतकडे निघाले होते. जतपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सैनिक नगरजवळ गाडीच्या आडवे आलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करताना गाडीचा तोल जाऊन गाडी पलटी झाली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना किरकोळ दुखापत झाली.
मात्र, सांगोलाहून जतकडे निघालेले माझी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी घटनास्थळी परिस्थिती पाहून ॲम्बुलन्स व पोलीस यांना तात्काळ माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा केला. व मृतांना ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले. या घटनेची जत पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलिस कर्मचारी बंडगर करत आहेत.

Related Stories

मडगाव पालिकेत नागरिक केंद्रीत प्रशासन देणार

Patil_p

भाजप सुरु करणार पर्रीकर संशोधन केंद्र

Patil_p

सवदी यांचे वक्तव्य कर्नाटकातील जनतेला खुश करण्यासाठी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

कोरोनातही राजकारण

Patil_p

मतदान केंद्रांवर सर्व व्यवस्था ठेवा

Patil_p

सांगली जिल्ह्यात कोरोना उपाययोजना अंमलबजावणी समाधानकारक

Archana Banage