Tarun Bharat

जत पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकात बाचाबाची

प्रतिनिधी/जत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत नगरपरिषद मार्फत आयोजित बैठकीत काँगेसच्या महिला बालकल्याण सभापती यांचे पती व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते यांच्यात किरकोळ मतभेदांमुळे चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान, अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न झाला. काही काळ हा प्रकार सुरू होता. यानंतर नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांनी पडदा टाकला.

लॉकडाऊनची मुदत संपली असून चौथ्या टप्प्यासाठी लॉकडाऊन संदर्भात जत शहरातील दुकाने व इतर नियोजन करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान, सभापती अश्विनी माळी यांचे पती सभागृहात उपस्थित होते. सुरुवातीला सुजय शिंदे व आप्पू माळी यांच्यात किरकोळ वाद सुरू होता, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते स्वप्निल शिंदे हे बोलत असताना सभापती माळी यांचे पती आप्पु माळी यांच्यात वाद सुरू झाला,

दरम्यान, स्वप्नील शिंदे यांनी सभागृहाचे आपण सदस्य नाही. त्यामुळे मध्ये न बोलण्याचे सांगितले. यावरून शिंदे व माळी यांच्यात शाब्दिक चकमकीसह अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. तर वातावरण ही तंग झाले. यानंतर नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवर व उपनगराध्यक्ष आप्पासो पवार, भुपेंद्र कांबळे आदीनी मध्यस्थी करत या वादावर पडदा पडला. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Related Stories

काल जे घडलं ते लाजिरवाणं होतं – मुख्यमंत्री

Archana Banage

नागपुराच पावसाची रिमझिम सुरू ; वादळी वाऱ्याची शक्यता

Archana Banage

शहर पोलिसांनी दोन लाखाचा गुटखा पकडला

Patil_p

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना १० लाखांची मदत

Archana Banage

राजू शेट्टींना उपचारासाठी पुण्यात केले दाखल

Archana Banage

माणचा सुपूत्र देशासाठी हुतात्मा

Patil_p