Tarun Bharat

जत येथे खत दुकान फोडून 22 लाखाचा माल लंपास

प्रतिनिधी / जत

जत शहरातील प्रसिद्ध कृषी औषधे व खत दुकानदार साईराम कृषी सेवा केंद्राचे मार्केट कमीटीतील खते, औषधांचे गोडावून फोडून तब्बल २२ लाख ८८ हजाराचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी जत पोलीसांत दुकानाचे मालक सत्यवान भीमाशंकर मद्रेवार यांनी जत पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे.अधिक माहीती अशी, सत्यवान मद्रेवार यांचे जत शहरातील विजापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्पलेक्स समोर दुकान आहे.

शहरातील मोठे दुकान म्हणून त्ंयाची ओळख आहे. शेतीची खते, औषधे, बियाणे याचा मोठ्या प्रमाणात स्टॉक त्यांच्याकडे असतो. हा माल ठेवण्यासाठी समोरच बाजार समितीच्या आवारात त्यांनी एक गोडावून घेतले आहे. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री त्याच्या गाडावूनच्या मागील बाजूची भिंत कटरने फोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. त्यानंतर शटरचा दरवाजा आतून फोडून चोरांनी गोडावून मधील किंमती औषधांचे बॉक्स चोरांनी लंपास केले आहेत.

यात बेनीविया औषधाच्या २४० मिलीच्या २५ बाटल्यांचा बॉक्स असे एकूण १२ बॉक्स याची किंमत सहा लाख सहा हजार ९ ७२ रूपये बेनीविया औषधाच्या २८० मिलीच्या २० बाटल्याच्या बॉक्स ८ बॉक्स याची किंमत तीन लाख ७६ हजार ७८२ रूपये, बेनिविया औषधाच्या ३०० मिलीच्या २० बाटल्याचा बॉक्स २७ बॉक्स तेरा लाख चार हजार ९ ८८ रूपये असा एकुण २२ लाख ८८ हजार ७७२ रूपये किंमतीचा माल लंपास केला आहे. याप्रकरणी सपोनि मोहीते तपास करत

गेल्या शनिवारी फोडले होते दुकान…

विशेष म्हणजे अज्ञात चोरांनी गेल्या शनिवारी हेच दुकान मागच्या बाजूच्या, भितीला भगदाड पाडुन फोडले होते. परंतु त्यावेळी काहीएक साहीत्य व औषधे, त्यांनी नेली नाहीत. त्यानंतर बरोबर सात दिवसांनी पुन्हा शनिवारीच हे गोडावून कटरने फोडून तब्बल २२ लाख ८८ हजाराचा माल लंपास केला आहे.

Related Stories

सांगली जिल्ह्यात पुन्हा गव्याची एन्ट्री

Kalyani Amanagi

सांगली : कत्तलखाना बंदसाठी लोकप्रतिनिधींची निदर्शने

Archana Banage

कुपवाडमध्ये चोरी; २० हजारांचे इलेक्ट्रिक साहित्य लंपास

Archana Banage

पदवीधर मतदारसंघ निवडणुकची उत्सुकता शिगेला

Archana Banage

मूकपदयात्रेने बलिदान मासाची सांगता

Archana Banage

सांगली : कृष्णा नदीत मगरीचे दर्शन

Archana Banage