Tarun Bharat

जनरल बिपिन रावत यांच्या गावातून काँग्रेस काढणार शोकयात्रा

दिल्ली / प्रतिनिधी

तामिळनाडूमध्ये नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले संरक्षण प्रमुख (CDS) बिपिन रावत यांच्या स्मरणार्थ उत्तराखंडमधील त्यांच्या गावातून त्यांच्या ‘तेरहवी’वर तीन दिवसीय ‘यात्रा’ काढण्याची घोषणा काँग्रेसने शुक्रवारी केली.

‘यात्रा’ 20 किंवा 21 डिसेंबरपासून सुरू होईल, जो दिवस ‘तेरहवी’ असेल, तो दिवस अनेक हिंदू कुटुंबातील लोक शोक दिवस म्हणून पाळतील. या तीन दिवसीय प्रचाराची सुरुवात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गणेश गोदियाल रावत यांच्या गावातून केली जाईल. असे उत्तराखंडमधील काँग्रेसचे प्रचारप्रमुख हरीश रावत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष गोविंद सिंग कुंजवाल हे त्याच दिवशी कुमाऊंमधील उत्तराखंडचे पहिले लष्करप्रमुख जनरल बीसी जोशी यांच्या गावातून याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दुसरी ‘यात्रा’ काढणार आहेत.

Related Stories

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यसोहळा ठरला अविस्मरणीय!

Patil_p

सीमा समृद्धी लढणार हाथरची केस

datta jadhav

उत्तर प्रदेश : विधानसभा सचिवालयातील 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता साधणार जनतेशी संवाद

Tousif Mujawar

इंधन दरवाढीचा भडका सुरूच

Patil_p

Gujrat Election : गुजरातमध्ये आप नक्कीच बाजी मारेल- केजरीवाल

Abhijeet Khandekar