Tarun Bharat

जनसंपदा फौंडेशनतर्फे म.ए.समितीच्या कोविड सेंटरला मदत

प्रतिनिधी / बेळगाव

येळ्ळूरमधील जनसंपदा फौंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाकाळात मदतीचा हात पुढे केला आहे. पहिल्या लाटेच्यावेळी येळ्ळूर गावामध्ये मास्क, सॅनिटायझर फवारणी केली होती. याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी मोफत संगणक सेंटर सुरू केले आहे. आता म. ए. समितीच्या कोविड सेंटरला 1 हजार मास्क, 100 सॅनिटायझर बॉटल्स, फरशी फुसण्यासाठी क्लिनर्स असे साहित्य वितरित केले आहे.

जनसंपदा फौंडेशनचे अध्यक्ष परशुराम मंगनाईक यांनी म. ए. समितीचे कोविड विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या इंद्रजित धामणेकर, बाळू जोशी, अहमद रश्मी, प्रवीण रेडेकर यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले आहे. म. ए. समितीच्या या कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण बरे होत आहेत.जनसंपदा फौंडेशनचे परशुराम मंगनाईक यांनी ग्रामीण भागामध्ये नेहमीच मदत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जनसंपदा फौंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी यासाठी त्यांनी मोफत संगणक केंद्रही सुरू केले आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान देण्यात येत आहे. याबद्दल येळ्ळूर परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.

Related Stories

25 एकरातील भातपीक गेले वाहून

Patil_p

बेंगळूर: एसएसबीच्या मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांना क्वारंटाईनमध्ये सूट

Archana Banage

मंगसुळी ग्राम पंचायतीसाठी 90 उमेदवार रिंगणात

Omkar B

एमटीबी हिमालय इव्हेंटमध्ये सुयश

Amit Kulkarni

यंदा ही राहिले महत्वाचे मुद्दे ; अधिवेशन झाला अनिर्धारित कालावधीसाठी तहकूब

mithun mane

एपीएमसी पोलीस स्थानकाला घेराव

Amit Kulkarni