Tarun Bharat

जनसुराज्य शक्तीपक्षाच्या सरचिटणीस, प्रवक्तेपदी अॅड. राजेद्र पाटील यांची निवड


वारणानगर / प्रतिनिधी

येथील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सरचिटणीस व प्रवक्तेपदी अॅड.राजेद्र विष्णू पाटील रा. गणेश पार्क कोडोली ता. पन्हाळा यांची निवड झाली असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी या निवडीचे पत्र दिले आहे.

वारणा समूहातील संस्थाचे कायदे विषयक सल्लागार तसेच पन्हाळा, कोल्हापूर येथील न्यायालयात प्रथितयश वकील म्हणून अॅड. राजेद्र पाटील ओळखले जातात कोडोली ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी यापूर्वी काम केले आहे.

वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते कै. भाई विष्णू शंकर पाटील यांचे अॅड. राजेद्र पाटील सुपूत्र असून विद्यार्थीदशेपासूनच ते सामाजिक क्षेत्रात काम करतात. सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी ता. वाळवा हे त्याचे मूळ गांव आहे.
.

Related Stories

मेडिकल कॉलेजला यशवंतरावांचे नाव द्या

Patil_p

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या संचालक,सीईओ पदी आयुक्त पी.शिवशंकर यांची निवड

Archana Banage

आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या

Patil_p

पदभार स्वीकारताच नारायण राणेंची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर टीका

Archana Banage

एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा एकत्र लढा उभारा, विरोधकांना वडेट्टीवारांचा सल्ला

Archana Banage

“ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना वीज बिलात सवलत द्या”

Archana Banage