Tarun Bharat

जनावरांची सृष्टी पांजरपोळ हाऊसफुल्ल

वर्षभरात 75 भटकी, शेतकऱ्यांची वृद्ध जनावरे पांजरपोळमध्ये दाखल, संगोपन, सुश्रुषेवरील खर्चात मोठी वाढ


कोल्हापूर / संग्राम काटकर

आईपासून दुरावलेल्या, अपघातात जखमी झालेल्या भटक्यांसह शेतकऱयांनी आणून सोडलेल्या वयस्कर जनावरांची सुश्रुषा करणारी श्री पांजरपोळ संस्था आजमितीला गाय, म्हैशी, बैल, वासरु आणि पाडसांनी हाऊसफुल्ल झाली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 75 जनावर पांजरपोळात दाखल झाली आहेत. त्यामुळे एका सृष्टीच रुप आलेल्या पांजारपोळात आता 325 हून अधिक जनावरे झाली आहेत. वाढत्या महागाईबरोबरच वाढत्या जनावरांच्या संख्येमुळे संगोपनाबरोबरच चारा आणि औषधांवर करावा लागणारा खर्चही वाढला आहे. रोज सुमारे 25 हजार रुपये जनावरांच्या सुश्रुषेवर खर्च होत आहेत. असे असले तरी समाजातील सार्वजनिक मंडळे, दानशुर व्यक्तीसह जैन बांधवांकडून मिळणाऱ्या देणगी, औषध, चाऱयामुळे पांजरपोळचा गाडा नीट चालत आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेतून जीवदयेचे महान कार्य करत असलेल्या पांजरपोळची 1906 साली शाहूमिल परिसरात स्थापना झाली. स्थापनेच्या उद्देशाप्रमाणे समाजात भटकणाऱया जनावरांना पांजरपोळमध्ये आणून त्यांचे संगोपन केले जाऊ लागले. संगोपन करताना जनावरांना व्याधी असल्याचेही दिसून येऊ लागले. या व्याधींचा इतर जनावरांना संसर्ग होऊ नये म्हणून जनावरांच्या सुश्रुषेसाठी सुविधायुक्त असे चिकित्सालयाची स्थापना केली आहे. येथे अशक्त, अपंग, वृद्ध जनावरांवर डॉक्टर, कर्मचारी वर्गाकडून उपचार करुन त्यांना जीवदान दिले जाऊ लागले. उपचारानंतर पोटच पोर समजून जनावरांची सुश्रुषा केली जाऊ लागली.

सध्या पांजरपोळात जनावरांसाठी 8 तर चाऱयासाठी 1 शेड आहे. पावसाळ्यानंतर या चाऱयाच्या शेडमध्ये गरजेनुसार कुशीरे (ता. पन्हाळा) परिसरातील संस्थेच्या जागेतून मोठÎा प्रमाणात चांगला चारा आणून ठेवला जाऊ लागला. जनावरांना चांगला चारा देण्याबरोबरच शुद्ध पाण्याची देण्याचाही सोय केली. प्रत्येक जनावराला ऐकू येईल, इतक्या आवाजात गायत्री मंत्र, नवकार मंत्र आणि मंत्राक्षरीची सीडी लावली जात असल्याने पांजरपोळात रोज प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून ज्या शेतकऱयांना आपल्याकडील वयोवृद्ध जनावरांवर औषधोपचार करणे कठिण जात आहे, ते शेतकरी जनावर कापायला देण्याऐवजी पांजरपोळमध्ये आणून सोडत आहेत. गेल्या वर्षात सामान्य व गरीब शेतकऱयांनी 58 च्या आसपास जनावरे पांजरपोळात दाखल केली आहे. तसेच गेल्या दोन महिन्यात महापालिकेने रस्त्यावर भटकणाऱया 17 गाय, वासरु आणि पाडसं पांजरपोळकडे सुपूर्त केली आहेत. तसेच सालाबादप्रमाणे गेल्या दहा महिन्यात शेतकऱयांनीही आपल्याकडील वयोवृद्ध गाय, बैल आणि म्हैशी पांजरपोळमध्ये आणून सोडल्या आहेत.

त्यामुळे 325 जनावरांनी पांजरपोळ अगदी हाऊसफुल्ल झाले आहे. यापैकी काही जनावरं वाढत्या वयोमानानुसार आजारी पडणार हे गृहीत धरून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संस्थेला मोठा खर्च करावा लागणार आहे. तसेच जनावरांसाठी मोठÎा प्रमाणात चारा आणण्याची व्यवस्थाही करावी लागणार आहे. सध्या जनावरांना टिंबर मार्केट परिसरातील गवत मंडईतून जनावरांना पुरेल इतका चारा सातत्याने आणला जात आहे.

अगदी अलिकडेच जनावरांची आरोग्याची तपासणी करताना डॉ. राजकुमार बागल यांना दोन भटक्या गायींना पोटाला विकार असल्याचे आढळून आले आहे. लोकांना घरातील भाज्यांचे तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत बांधून त्या कोंढळ्यात टाकलेल्या असतात. भुकेपोटी या दोन गायींनी भाज्यासह प्लास्टिक पिशवीही खाल्ल्या असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता लवकरच विविध अंगांनी तपासणी करुन गायींच्या पोटावर शस्त्रक्रीया केली जाईल.

सहकार्याच्या भावनेने मदत करा

पांजरपोळात जनावरांची संख्या वाढल्याने चारा आणि औषधांच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. तेव्हा ज्यांना सहकार्याच्या भावनेने चारा अथवा देणगी स्वरुपात मदत देण्यासाठी दानशुरांनी पुढे यावेत. तसेच ज्यांना औषध स्वरुपात मदत करायची आहे, त्यांनी पांजरपोळमधील औषधांची यादी मिळवून त्याप्रमाणे औषधे द्यावी, असे आवाहन डॉ. राजकुमार बागल यांनी केले आहे.

Related Stories

पुलाची शिरोलीत नदीकाठावर सापडले मगरीचे पिल्लू

Archana Banage

महिला प्रवाशांसाठी के.एम.टी.च्या ‘विशेष बससेवेचा’ प्रारंभ

Archana Banage

माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. संभाजीराव गोरे यांची निवड

Archana Banage

गगनबाबड्यात शहीद जवानाच्या मातोश्रीच्या हस्ते ध्वजारोहण

Archana Banage

जिल्ह्य़ातील बारा तहसिलदार कार्यालयांसमोर जनजागृती फलक

Archana Banage

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदत वाढली

Archana Banage