Tarun Bharat

जनावरांना फळभाजी घालताना दक्षता घ्या

फ्लावरचा पाला घातल्याने म्हैस दगावली तर तीन अत्यवस्थ

प्रतिनिधी / बेळगाव

सराफ गल्ली, शहापूर येथील एका शेतकऱयाने जनावरांना फ्लावरचा पाला घातला. यामुळे किटक नाकश औषध फवारणी केलेला पाला खाल्यामुळे एक म्हैस दगावली तर तीन अत्यवस्थ झाल्या होत्या. यामुळे शेतकऱयाला जवळपास 1 लाखांहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तेव्हा शेतकऱयांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे असून पाला स्वच्छ करुनच जनावरांना घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सराफ गल्ली येथील शेतकरी ज्ञानेश्वर सुब्राव चौगुले यांनी जनावरांना बाजारातून चारा आणला. त्यामध्ये फ्लावरच्या पाल्याचा समावेश होता. त्या पाल्यावर किटकनाशक औषध फवारणी झाली होती. मात्र याबाबत कोणतीच माहिती नसल्यामुळे चौगुले यांनी तो तसाच पाला जनावरांना घातला. काही वेळातच चार म्हैस अचानक अत्यवस्थ झाल्या. त्यानंतर इतर शेतकऱयांनी आणि शंकर बाबलीचे यांनी वडगाव पशुवैद्यकीय केंद्राचे डॉक्टर विनयकुमार संग्रोळी यांना याची माहिती दिली.

तातडीने ते आणि त्यांचे सहाय्यक एस. एम. मुल्ला हे दाखल झाले. उपचार सुरु केले. मात्र एक म्हैस त्यामधील दगावली. तीन म्हशींवर उपचार सुरु आहेत. अचानक या घडलेल्या घटनेमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जवळपास 150 लाख रुपयाचा फटका या शेतकऱयाला बसला आहे.

शेतकऱयांनो कोणताही पाला घालताना दक्षता घ्या

सध्या ओल्या चाऱयाची टंचाई आहे. त्यामुळे फ्लावर, नवलकोल, कोबी याचा पाला जनावरांना घालण्यात येत आहे. मात्र या सर्व पालेभाज्यांवर किटकनाशक फवारणी केली जाते. असा पाला जनावरांना धोकादायक आहे. तेंव्हा कोणताही पाला स्वच्छ करुन घालावा. अन्यथा नाहक मोठा फटका बसण्याची भिती व्यक्त होत आहे.

Related Stories

उपमुख्यमंत्र्यांची सरकारी पॉलिटेक्निकला भेट

Patil_p

कुद्रेमनीत आज साहित्यिकांची मांदियाळी

Patil_p

रस्ता दुरुस्तीसाठी किल्ला प्रवेशद्वार वाहतुकीस बंद

Amit Kulkarni

फल-पुष्प प्रदर्शनाला 18 पासून प्रारंभ

Rohit Salunke

एक नळ दोन बिलाबाबत चौकशी करा

Amit Kulkarni

दीपशिखा थोरातला स्क्वॅश स्पर्धेत तिसरे स्थान

Amit Kulkarni