Tarun Bharat

जनिता मडकईकर यांचा धुळापी येथे घरोघरी प्रचार

प्रतिनिधी /पणजी

कुंभाजुवे मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार तसेच माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जनिता मडकईकर यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला असून काल त्यांनी धुळापी गावात दिवसभर घरोघरी जाऊन मतदारांना भेटून आपल्यास विजयी करण्याचे साकडे घातले.

जतिना मडकईकर यांच्या बरोबर त्यांचे अनेक कार्यकर्तेही होते. एक महिला उमेदवार म्हणून त्यांचे त्यांच्याकडे लोक सकारात्मकतेने पाहत आहेत. पांडुरंग मडकईकर गेली कित्येक वर्षे मतदारसंघातील घरोघरी संपर्क ठेवून आहेत, तसेच त्यांच्याबरोबर जनिताही यापुर्वीच घरोघरी पोहोचलेल्या आहेत, असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

ओल्ड गोव्याच्या सरपंच म्हणूनही त्यांना प्रशासकीय, समाजिक कार्याचा अनुभव आहे. पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की भाजपने आपणास उमेदवारी देऊन पांडुरंग मडकईकर यांच्या कार्याची दखल घेतली आहे, आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या अनुभवी महिलेला उमेदवारी देऊन आपला सन्मान केला आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते माझ्यासाठी प्रचार करत आहेत. आमचे मतदासंघातील कार्य सर्व मतदारांना गेली वीस वर्षे माहित आहे. त्याच्या बळावरच मतदार आपल्याला विजयी करतील. तरीही प्रत्येक घरी पोहोचणे महत्वाचे आहे, म्हणून आम्ही घरोघरी भेटी देत आहोत असेही त्या म्हणाल्या.

आतापर्यंत त्यांनी ओल्ड गोवा, गवंडाळी, धावजी, करमळी, धुळापी, कुंभाजुवे भागात घरोघरी प्रचार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Stories

द्रविड संघाच्या कार्यासाठी युवा व महिला शक्तीला प्राधान्य

Amit Kulkarni

ग्रेटर पणजी पीडीएच्या सीमा ओल्ड गोवा चर्चपर्यंत नेण्याचा घाट

Patil_p

शुक्रवारी सापडले 190 नवे कोरोनाबाधित

Omkar B

कोरोना : कोकण रेल्वेकडून मदतनिधी

Patil_p

पत्रकार गोविंद खानोलकर यांचे अपघाती निधन

Patil_p

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱया पतीला अटक

Amit Kulkarni