मेलबर्न : डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या मेलबर्न समर सेट महिलांच्या टेनिस स्पर्धेत जपानची नाओमी ओसाकाने गुरूवारी एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना बेल्जियमच्या झेनीव्हेस्काचा पराभव केला.महिला एकेरीच्या झालेल्या या सामन्यात टॉप सीडेड ओसाकाने बेल्जियमच्या मारियाना झेनीव्हेस्काचा 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. . अन्य एका सामन्यात रूमानियाच्या हॅलेपने आपल्याच देशाच्या इलिना रूसचा 6-2, 6-1,स्वीसच्या गोलुबिकने हॉलंडच्या केरकेहोवचा 6-3, 6-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.


previous post
next post