Tarun Bharat

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे देणार राजीनामा

ऑनलाईन टीम / टोकियो : 

दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने जपानचे पंतप्रधान शिंजो आबे देणार राजीनामा देणार आहेत. जपानच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

आबे यांना अल्सरचा त्रास आहे. त्यांच्या आतड्याला मोठ्या प्रमाणात सूज असून, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. त्याचा सरकारी कामावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज संध्याकाळपर्यंत राजीनाम्याची औपचारिक घोषणा करणार आहेत. आबे यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. 

दरम्यान, करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात आबे प्रशासनाला अपयश आले. त्यावर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आठ वर्षाच्या या कार्यकाळात पहिल्यांदाच त्यांच्या लोकप्रियतेत 30 टक्क्यांची घट झाली. आबे यांच्या राजीनाम्याच्या अटकळीमुळे जपानचा शेअर बाजार कोसळला आहे. 

Related Stories

बहरिनचे पंतप्रधान शेख खलिफा यांचे निधन

datta jadhav

ब्रिटनमध्ये ‘डेल्टा’ व्हेरियंटमध्ये उत्परिवर्तन

Patil_p

ऑस्ट्रेलियात पुन्हा परतले लॉकडाउन

Amit Kulkarni

लष्कराने थेट पंतप्रधानांच्या घरात घुसून त्यांना केलं नजर कैद

Archana Banage

पेंटागॉननजीक बेछूट गोळीबार, अधिकाऱयाचा मृत्यू

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान; एका दिवसात 31,890 नवे रुग्ण

datta jadhav