Tarun Bharat

जपानमध्येही आरोग्य संकट

Advertisements

जगभरात 1 लाख 54 हजार 807 जणांचा मृत्यू 20 हजारांपेक्षा अधिक स्पेनमध्ये बळी

जगभरात कोरोना विषाणूची आतापर्यंत 22 लाख 62 हजार 799 जणांना बाधा झाली आहे. तर 1 लाख 54 हजार 807 जणांचा मृत्यू झाला आहे. या संकटादरम्यान दिलासा देणारी बाब म्हणजे 5 लाख 81 हजार 142 जणांना संसर्गावर मात केली आहे. स्पेनमध्ये 24 तासांत 687 जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा 20,002 वर पोहोचला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक 1 लाख 90 हजार 839 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशातील 74 हजार 797 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर जपानमध्ये वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेचे संतुलन बिघडले आहे. तेथे 9787 रुग्ण सापडले आहेत.

जपानमध्ये रुग्णांचे हाल

जपानमध्ये वाढत्या रुग्णांमध्ये वैद्यकीय व्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाच्या रुग्णांना दाखल करून घेण्यास रुग्णालये नकार देत आहेत. अलिकडेच ताप किंवा श्वसनावेळी त्रास होणाऱया सुमारे 80 रुग्णांची तपासणी करण्यास रुग्णालयाने नकार दिला आहे. जॉन हॉपकिंस विद्यापीठानुसार शुक्रवारपर्यंत देशात 9787 रुग्ण सापडले असून 190 जणांना जीव गमवावा लागला आहे. वाढत्या रुग्णांमुळे पंतप्रधान शिंजो आबे आता देशभरात आणीबाणी लागू करू शकतात.

भारताचे कौतुक

संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख ऍण्टोनियो गुतेरेस यांनी कोरोना विरोधातील लढाइंत सहकार्य करणाऱया भारतासारख्या देशांचे कौतुक केले आहे. भारताने अमेरिका, ब्राझील, इस्रायल यासारख्या अनेक देशांना हिवतापासाठी वापरले जाणारे औषध हायड्रॉक्सी क्लोरोक्विन पुरविले आहे. अमेरिकन फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनकडून हे औषध कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरविण्यात आले आहे. भारताने या औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटविल्यावर अनेक देशांकडून याची मोठी मागणी होत आहे.

वन्यजीवांच्या मांसाचा व्यापार थांबवा

महामारीमुळे सर्व देशांनी वन्यजीवांच्या मांसाच्या व्यापारावर कठोर बंदी घालावी. या बाजारांमुळे बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असतो. वेट मार्केट (मांसबाजार) पूर्णपणे सुरक्षित तसेच स्वच्छता राखणार असतील तरच त्यांना अनुमती दिली जावी. नव्या विषाणूचा 70 टक्के हिस्सा प्राण्यांमधून आला आहे. प्राण्यांमधून विषाणूचे माणसांमध्ये होणारे संक्रमण प्रभावीपण रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहॉनम गेब्रेसिएसस यांनी काढले आहेत.

शेतकऱयांना 19 अब्ज डॉलर्सची मदत

Crafty Maibritt takes a phone call during the American Legion Farmer’s Market on Friday afternoon.

अमेरिकेत शुक्रवारी 2 हजार 535 जणांचा मृत्यू झाला असून 32 हजार 165 नवे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या आता 37 हजार 175 झाली आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 10 हजार 272 वर गेला आहे. देशातील 8 कोटी लोकांना मदतनिधी मिळाला आहे. प्रशासन शेतकऱयांना 19 अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे. शेतकऱयांना 16 अब्ज डॉलर्सची रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल तर भोजन वाटपासाठी 3 अब्ज डॉलर्सचा वापर केला जाणार असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

पाकिस्तानला अमेरिकेकडून मदत

अमेरिकेने पाकिस्तानला कोरोना नियंत्रणासाठी 84 लाख डॉलर्सची मदत केली आहे. अमेरिकेचे राजदूत पॉल जोन्स यांनी याची घोषणा केली आहे. पाकिस्तानात पंजाब आणि सिंध प्रांत मोठे हॉटस्पॉट ठरत चालले आहेत. देशातील एकूण 7404 रुग्णांपैकी सुमारे 75 टक्के म्हणजेच 5608 रुग्ण या दोन्ही प्रांतातील आहेत. शनिवारी 4 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा 138 झाला आहे.

रमझानकाळात घरातच प्रार्थना करा

रमझानचा पवित्र महिना काही दिवसांनी सुरू होणार आहे. परंतु या काळात सौदी अरेबियातील मोठय़ा मशिदी बंद राहणार आहेत. रमझानकाळात घरातच प्रार्थना करा असे आवाहन या मशिदींच्या व्यवस्थापनाने केले आहे. रमझानकाळात अल अक्सा मशिद बंद राहणार असल्याचे जेरूसलेमच्या इस्लामिक वक्फ कौन्सिलने स्पष्ट केले आहे. इजिप्त आणि जॉर्डननेही मशिदींमध्ये नमाजावर बंदी घातली आहे.

ब्रिटनमध्ये लसीसाठी कृतिदल

ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 14,576 जणांचा बळी गेला आहे. लवकरात लवकर लस निर्माण करण्यासाठी सरकारने विशेष कृतिदलाची स्थापना केली आहे. सरकार महामारी रोखण्यासाठी योग्य दिशेने काम करत आहे. ब्रिटनची आरोग्य यंत्रणा नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस)ला वाचविण्यासाठी तीन आठवडय़ांची टाळेबंदी आवश्यक असल्याचे व्यापार सचिव आलोक शर्मा यांनी म्हटले आहे. टाळेबंदी लवकर मागे घेतल्यास विषाणू फैलावण्याची शक्यता कायम राहणार असल्याचे शर्मा म्हणाले.

दक्षिण कोरियात 232 बळी

दक्षिण कोरियात 24 तासांत 18 नवे रुग्ण सापडले आहेत. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून 10 हजार 653 झाली आहे. तर आतापर्यंत 232 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. देशात दोन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच एका दिवसातील नव्या रुग्णांचा आकडा 20 पेक्षा कमी झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये 9 जण विदेशातून आलेले नागरिक आहेत. दक्षिण कोरियात कोरोना रुग्णांमधील मृत्यूदर 2.18 टक्के आहे.

चीनमध्ये 27 नवे रुग्ण

चीनमध्ये 27 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये 17 जण विदेशामधून आलेल्या लोकांचा तर 10 स्थानिकांचा समावेश आहे. हेइलोंगजियांग प्रांतात 7, गुआंग्डोंग प्रांतात 2 आणि सिचुआन प्रांतात एका रुग्णाची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी कोरोनामुळे चीनमध्ये एकाचाही मृत्यू झालेला नाही.

इटलीत बरे होणाऱयांचे प्रमाण

इटलीत आतापर्यंत 22,745 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 72 हजार 434 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  इटलीत मोठय़ा संख्येत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. येथील रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या बऱयाच प्रमाणात कमी झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱयांनी दिली आहे.

Related Stories

कित्येक तास काम केल्यावर रडतच घरी परततो!

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते

Abhijeet Shinde

नेपाळमध्ये भूस्खलनात 17 ठार, 6 बेपत्ता

Patil_p

सिंगापूर नंतर आता पोलंडमधील निर्बंध उठणार

Patil_p

सुडाग्नीत होरपळले अरब जगत

Patil_p

वायुदल प्रमुख 5 दिवसांच्या इजिप्त दौऱयावर

Patil_p
error: Content is protected !!