Tarun Bharat

जपान पंतप्रधानांचा भारत दौरा लांबणीवर

टोकयो / वृत्तसंस्था

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस जपानचे पंतप्रधान भारतात येणार होते. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने सुरू असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून जपानच्या प्रशासनाकडून यासंबंधीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान सुगा हे भारत आणि फिलिपाईन्स या देशांना भेट देणार होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या वाढत्या फैलावामुळे त्यांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द करण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही आपला पूर्वनियोजित भारत दौरा रद्द केला आहे. तसेच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुढील महिन्यातील पोर्तुगालचा दौरा लांबणीवर टाकला आहे.

Related Stories

नेपाळमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा सहा तासानंतर लागला शोध

Archana Banage

मलेशियाच्या पंतप्रधानपदी इस्माइल सब्री याकोब यांची निवड

Patil_p

47 वर्षांनंतर ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर!

Patil_p

अमेरिकेकडून भारतीयांना मोठा दिलासा

Patil_p

युरोप : 3 लाख बळी

Omkar B

चंद्र पाहून टेस्ला कार गोंधळात

Patil_p