Tarun Bharat

जबाबदार नागरिक म्हणून युवकांना घडवण्यासाठी एनसीसी कटीबद्ध

दिल्ली/प्रतिनिधी

राष्ट्र उभारणीच्या कार्यात भरीव योगदान देणारे जबाबदार नागरिक म्हणून युवकांना घडवण्यासाठी एनसीसी कटीबद्ध आहे. असे वक्तव्य राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल तरुण कुमार यांनी केले आहे. २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात एनसीसी छात्रांची दोन पथके सहभागी होणार असून मुलांचे एक आणि मुलींचे एक पथक असेल अशी माहिती त्यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना दिली. प्रजासत्ताक दिन शिबीर, आरडीसी-२०२१ मध्ये सहभागी होणाऱ्या छात्रांमधून यासाठी निवड करण्यात येणार आहे. ४ जानेवारी २०२१ पासून दिल्लीत करिअप्पा परेड मैदानात हे शिबीर सुरु झाले आहे. एक महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात २८ राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशातल्या ३८० महिला छात्रांसह १००० छात्र सहभागी झाले आहेत. आपल्या देशाची समृध्द संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवण्याचा प्रजासत्ताक दिन शिबिराचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान २८ जानेवारीला पीएम रॅलीसाठी एनसीसी शिबिराचा दौरा करणार आहेत.

कोविड -१९ महामारीदरम्यान १,३९,९६१ एनसीसी छात्र आणि २१,३८० कर्मचाऱ्यांच्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.
‘एनसीसी योगदान’ या माध्यमातून वाहतूक व्यवस्था, अन्नधान्य आणि आवश्यक वस्तुचे वितरण, रांगेचे व्यवस्थापन, सोशल डीस्टन्स, ज्येष्ठ नागरिकांना मदत, सीसीटीवी नियंत्रण कक्ष, भोजनाची पैकेट तयार करून त्याचे वितरण, मास्क तयार करून गरजूंना त्याचे वाटप यासारख्या उपक्रमात एनसीसी छांत्रानी आघाडीचे कोरोना योद्धे म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.

Related Stories

वाहतूक कोंडी झाल्यास भरावा लागणार नाही टोल?

Patil_p

राहूल गांधींनी स्वत:ला सिद्ध केले असून विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतात : शरद पवार

Abhijeet Khandekar

लखीमपूर खेरी साक्षीदारांना संरक्षण द्या !

Patil_p

कोरोनाची धास्ती : पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

नवे बाधित नियंत्रणात; कोरोनाबळींचा उच्चांक

Patil_p

पंतप्रधान मोदींनी राजकारणाची संस्कृतीच बदलली !

Patil_p