Tarun Bharat

‘जब खुली किताब’चा फर्स्ट लुक सादर

पंकज कपूर अन् डिंपल कपाडिया यांचा चित्रपट

दिग्गज अभिनेते पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा आगामी चित्रपट ‘जब खुली किताब’चा फर्स्ट लुक समोर आला आहे. या रोमँटिक-कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ शुक्ला यांनी केले आहे. हा चित्रपटाची कहाणी त्यांनीच लिहिलेली असून तेच याची निर्मिती करत आहेत.

पंकज-डिंपल यांच्यासह चित्रपटात अपारशक्ती खुराना, समीर सोनी आणि नौहिद सायरसी देखील मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. उत्तराखंडवर आधारित या चित्रपटाने अलिकडेच रानीखेतमध्ये स्वतःचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. अप्लॉज एंटरटेनमेंट आणि शू स्ट्रफ फिल्म्सने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.

50 वर्षांपर्यंत एकत्र राहिल्यावर वृद्ध जोडपे घटस्फोटाची मागणी करताना या चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट नात्यांमधील उणीवा आणि कुटुंबावरील याच्या प्रभावाची कहाणी दर्शविणारा आहे. पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यासारखे दिग्गज कलाकार यात आहेत. कुठल्याही नात्यात पारदर्शकता आणि स्पष्टपणा असावा, पण स्वतःच्या नात्यांच्या सत्याला सामोरे जाण्यासाठी किती जण तयार असतात असे प्रश्नार्थक विधान सौरभ शुक्ला यांनी केले आहे.

Related Stories

अभिनेत्रीसह लेखिका झाली तमन्ना भाटिया

Patil_p

एक्स-बॉयफ्रेंड च्या प्रेमात जान्हवी कपूर

Patil_p

टेलर स्विफ्टचा ‘रेड’ अल्बम होणार लाँच

Patil_p

बॉलिवूड पदार्पणासाठी नागा चैतन्य उत्सुक

Patil_p

गौरी खानने लेकीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Patil_p

सई ताम्हणकरला मिळाला ड्रिमबॉय

Patil_p