Tarun Bharat

जमखंडीत 508 तांदळाची पोती जप्त

ग्रामीण पोलीस, महसूल अधिकाऱयांची कारवाई, दोघांसह मुद्देमाल जप्त

वार्ताहर/ जमखंडी

बेकायदेशीररित्या तांदळाची वाहतूक करीत असलेला ट्रक जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई जमखंडी पोलिसांनी महसूल अधिकाऱयांच्या सहकार्याने केली. तांदळाची किंमत अंदाजे 4 लाख असल्याचे समजते. दरम्यान पुन्हा एकदा शासकीय योजनांना गैरव्यवहाराची कीड लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, जमखंडीतील एका गोदामातून माल भरून हा ट्रक मुंबईकडे निघाला होता. धारवाड-सोलापूर रस्त्यावर जमखंडीतील ए. आर. टी. ओ. कार्यालयाजवळ जमखंडी ग्रामीण पोलीस व महसूल अधिकाऱयांनी ट्रक अडवून तपासणी केली. यात 50 किलो वजनाची 508 तांदळाची पोती आढळून आली. यानंतर अधिकाऱयांनी (एमएच 50, 1175) ट्रक जप्त केला. चालक अप्पासाब शोकत बडक्यागोळ (रा. हलकर्णी ता. गडहिंग्लज) व साहाय्यक इम्रान बाबासाहेब मालदार (रा. संकेश्वर) यांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. ट्रक मालक व येथून तांदूळ पुरविणारे बेपत्ता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय अनिलकुमार राठोड, महसूल अधिकारी डी. बी. देशपांडे, आहार निरीक्षक निंगाप्पा देसाई यांनी प्रकरण दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Related Stories

यल्लम्मा मंदिर भाविकांसाठी खुले

Amit Kulkarni

गोकाक ग्लॅडिएटर्स संघाचा 11 धावांनी विजय

Patil_p

सर्व कागदपत्रे मराठी भाषेतून द्या

Amit Kulkarni

सार्वजनिक वाचनालयातर्फे साने गुरुजींना अभिवादन

Amit Kulkarni

‘अवघा रंग एक झाला’ आज कार्यक्रम

Amit Kulkarni

14 लाख एलईडी बल्बचे बेळगाव जिल्हय़ात वितरण

Amit Kulkarni