Tarun Bharat

जमखंडी नगराध्यक्षपदासाठी दोन सदस्यांमध्ये स्पर्धा

मोहन सावंत/ जमखंडी

अडिच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर जमखंडी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. नगरपालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असले तरी नगराध्यक्ष पदासाठी परिशिष्ट जाती आरक्षण आले आहे. त्यामुळे नगराध्यक्षासाठी काँग्रेसमधील दोघा इच्छुक सदस्यांनी आपली शक्ती पणाला लावली असल्याने पक्षश्रे÷ाr कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जमखंडी नगरपालिकेचे एकूण 31 सदस्य संख्याबळ असून काँग्रेसचे 20, भाजप 7 तर अपक्ष 4 उमेदवार विजयी झाले आहेत. तीन अपक्ष सदस्यांनी काँग्रेसला तर एकाने भाजपला पाठिंबा दर्शविला दिला आहे. त्यामुळे काँग्रेस 23 व भाजप 8 असे संख्याबळ झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात असला तरी नगराध्यक्षपद परिशिष्ट जाती व उपनगराध्यक्ष पदासाठी सामान्य महिला आरक्षण जाहीर झाले आहे.

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्ये÷ कार्यकर्ते व चार वेळा पालिकेवर निवडून आलेले माजी उपनगराध्यक्ष सिद्दू मिशी हे प्रबळ दावेदार आहे. प्रथमच निवडून आलेले युवा कार्यकर्ते दानेश घाटगे यांनीही नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दानेश घाटगे पहिल्यांदाच नगरपालिकेत प्रवेश करत असले तरी त्यांचे वडील शामराव घाटगे काँग्रेसमधून गत चार दशकाहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहिले आहेत. मात्र, काँग्रेस पक्षश्रे÷ाr ज्ये÷ कार्यकर्त्याला प्राधान्य देणार कि युवा नेतृत्त्वाला हे 3 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

भाजपचे 8 सदस्य असल्याने त्यांना विरोधी पक्षाची भूमिकच बजवावी लागणार आहे. जर या दोन सदस्यांत काँग्रेस पक्षश्रे÷ाr एकमत करू शकले नाहीत तर भाजपच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष निवड होण्याची शक्यता असून भाजपला उपाध्यक्षपद मिळू शकते. पण, सध्या तरी ही बाब अशक्मय वाटत आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी सामान्य महिला आरक्षण आले असून काँग्रेसमधील सहा महिला सदस्या इच्छुक असल्याचे समजते.

Related Stories

अरबाज खून प्रकरणाचे रहस्य उलगडले

Amit Kulkarni

मच्छे ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा, पतीला शिक्षा

Omkar B

उचगाव येथे आहार किटचे वितरण

Amit Kulkarni

खासगीपेक्षा सरकारी वाहने सुरक्षित

Amit Kulkarni

निकालात लागलेल्या खटल्यांची मूळकागदपत्रे घेण्याचे आवाहन

Amit Kulkarni

तालुक्यात नागपंचमी पारंपरिक पद्धतीने

Amit Kulkarni