Tarun Bharat

जमशेदपूरविरूद्धच्या बरोबरीने हैदराबादचे चौथे स्थान अबाधित

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या लढतीत हैदराबाद एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. वास्कोतील टिळक मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. हैदराबाद एफसी बाद फेरीच्या शर्यतीत असून चौथे स्थान भक्कम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना काहीसा धक्का बसला. या निकालाने उभय संघांना समान एक गुण प्राप्त झाला.

या बरोबरीने हैदराबाद एफसीने आपले चौथे स्थान कायम राखले. 13 सामन्यांत त्यांची ही सहावी बरोबरी असून चार विजय व तीन पराभवाने त्यांचे आता 18 गुण झाले. या बरोबरीने जमशेदपूरने दोन स्थानांनी आगेकूच केली. 13 सामन्यांत त्यांची पाचवी बरोबरी असून तीन विजय व पाच पराभवाने त्यांचे 14 गुण झाले.

सामन्याच्या सातव्या मिनिटाला जमशेदपूरच्या नेरीयूस वाल्सकीसचा गोल करण्याचा प्रयत्न अयोग्य नियंत्रणामुळे वाया गेला. हैदराबादने दोनच मिनिटांनी हैदराबादचा स्ट्रायकर जोएल चायनेस याला आरीदोन सँटानेने पास दिला. चायनेसच्या प्रयत्नावर गोलरक्षक टी. पी. रेहेनेशने बचाव केला व चेंडू बाहेर घालविला.

त्यानंतर 21 व्या मिनिटाला हैदराबादच्या हालीचरण नर्झारीचा फटका रेहेनेशने झेपावत अडविला तर 39व्या मिनिटाला जमशेदपूरच्या फारुख चौधरीने केलेला प्रयत्न थोडक्यात हुकला. दुसऱया सत्रात जमशेदपूरला आघाडीचा गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र, हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीने झकास गोलरक्षण करताना मॉनरॉयचा फ्रिकीक अडविला. शेवटच्या क्षणी जमशेदपूरच्या आलेक्सझांडर लिमाची गोल करण्याची संधी वाया गेल्यानंतर 80व्या मिनिटाला आरीदाने सँटानाने हाणलेला फटका स्वैर ठरला.

Related Stories

आजपासून शारदीय नवरात्रोत्सव

Amit Kulkarni

आंबे धुलैय ग्रामस्थांच्या नशिबी यंदाही होडीचा प्रवास

Omkar B

भुईपाल एसीजीएल कंपनीच्या स्टोअर विभागाला आग

Amit Kulkarni

पाच हजार लोकांची उद्यापासून कोरोना चाचणी

Amit Kulkarni

शिरोडा येथून 31 हजाराची बेकायदेशीर मद्यसाठा जप्त

Amit Kulkarni

वाळपई नवोदयाच्या दुसऱया टप्प्यातील काम रखडले.

Patil_p