Tarun Bharat

जमावबंदी व कोव्हीड-19 निर्गमित मनाई आदेशाचे उल्लंघन प्रकरणी दोडामार्गात गुन्हे दाखल

Advertisements

दोडामार्ग / वार्ताहर:
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी व कोव्हीड-19 निर्गमित मनाई आदेशाचे उल्लंघन करून जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झाल्याप्रकरणी दोडामार्गातील भाजपच्या 25 कार्यकर्त्यांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे हे काल जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने दोडामार्गात आले होते. शहरातील गांधीचौका लगतच्या पिंपळेश्वर सभागृहात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी व कोव्हीड-19 निर्गमित मनाई आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर जमाव जमवून घोषणा देऊन गुन्हा केल्याप्रकरणी दोडामार्ग शहर व तालुक्यातील एकूण 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रवीण गवस, चेतन चव्हाण, समिर रेडकर, संतोष नानचे, राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, दीपक गवस,  रंगनाथ गवस, देवेंद्र शेटकर, योगेश महाले, आप्पा गवस, लक्ष्मण नाईक, कल्पना बुडकुले, पराशर सावंत, राजेश फुलारी, प्रकाश गवस, रेहान कमर लतीफ, साजन गवस, सुधीर पनवेलकर, अनिषा दळवी, शैलेश दळवी, रमेश दळवी, सुधीर दळवी, राजेंद्र निंबाळकर, सूर्यकांत गवस व इतर 25 ते 30 लोकांवर गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी दिली.

Related Stories

इन्सुलीत शिवजयंती जल्लोषात साजरी

Ganeshprasad Gogate

नारळाच्या करवंटय़ांपासून बनविल्या राख्या

NIKHIL_N

संगमेश्वरातील प्रसिध्द शिवमंदिरे सोमवार पासून गजबजणार

Patil_p

चिपळुणात कोरोना वाढता वाढता वाढे!

Patil_p

सोसण्याचा सोस बाई सोड गं…

NIKHIL_N

चिपळुणात सात शिकारी अटकेत

Patil_p
error: Content is protected !!