Tarun Bharat

जमिनीच्या वादावरून दोन गटांत हाणामारी

आठजण जखमी, तिघांना अटककेरी-सत्तरीतीलघटना

प्रतिनिधी /वाळपई

सत्तरी तालुक्मयातील केरी येथे जमिनीच्या वादावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत एकूण आठजण जखमी झालेत. यासंदर्भात वाळपईच्या पोलीस स्थानकावर तक्रारी नोंद करण्यात आल्यानंतर एकूण तिघांना अटक केली असून इतरांवर  गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षकांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 सदर घटना 27 जून रोजी  केरी याठिकाणी घडली. याबाबतची माहिती अशी की, केरी  येथे 68/4  या जमिनीवर अनेकांत वाद सुरू आहे. मात्र यासाठी अनेक दावेदार आहेत. सदर जमिनीमध्ये गायत्री गोपाळ गावस व संबधित  गुरुदास राजाराम गावस व संबधित यांनी लागवडी केलेल्या आहेत. मात्र परस्परा दरम्यान या जमिनीचे आपणच मालक असल्याचे स्पष्ट करून वारंवारपणे खटके उडताना दिसत होते. 27 रोजी सदर जमिनीमध्ये लागवडीचे काम करीत असताना दोन गटांमध्ये यावरून बाचाबाची झाली व त्याचे पर्यावसन मारामारीत झाल्यामुळे एकूण आठजण जखमी होण्याचा प्रकार घडला. यासंदर्भात अधिक माहिती देताना  निरीक्षक सागर एकोस्कर यांनी सांगितले की, यासंदर्भातील तक्रारी वाळपईच्या पोलीस स्थानकावर दाखल करण्यात आलेले आहेत. गायत्री गोपाळ गावस यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कृष्णा हरिश्चंद्र गावस, वर्षा कृष्णा गावस गोपाळ हरिचंद्र गावस, तारामती हरिचंद्र गावस, गंभीरा गुरुदास गावस, मनीषा उदय गावस यांना दुसऱया गटातील गुरुदास गावस, लाडू लक्ष्मण गावस, गुरुप्रसाद लक्ष्मण गावस, श्याम लक्ष्मण गावस, अनिल विठो गावस, प्रवीण हरिश्चंद्र गावस, बाबाजी मनोहर गावस, सर्वेश मनोहर गावस, अर्जुन शिवा गावस, लता लाडू गावस देवयानी गुरुदास गावस, नीलम अर्जुन गावस, मनीषा गावस व शर्मिला गावस यांनी कोयता, दगड व दंडुक्मयाने जबर मारहाण केल्याची तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर गुरुदास राजाराम गावस यांनीसुद्धा परस्परविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांनी गायत्री गवस यांच्या गटातील सर्वावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. याबाबतची दखल घेऊन पोलिसांनी सध्यातरी कृष्णा हरिचंद्र गावस, गोपाळ भालचंद्र गावस, गायत्री गोपाळ गावस यांना अटक केलेली आहे.

 याबाबत अधिक माहिती देताना निरीक्षक एकोस्कर यांनी सांगितले की, यासंदर्भात अधिक चौकशी सुरू असून इतरांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येणार आहे.

न्याय न मिळाल्यास महिला आयोगाकडे धाव : गायत्री गावस

दरम्यान, सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गायत्री गावस यांनी न्याय देण्याची मागणी केली आहे. खास करून महिलावर्गावर ज्यापद्धतीने मारहाण करून अत्याचार करण्यात आले त्यासंदर्भातील गंभीर दखल पोलिसांनी घेणे गरजेचे होते. मात्र आमच्यावर पूर्णपणे अन्याय झालेला आहे. आम्ही गुन्हा केला असेल तरच आम्हाला जरुर अटक करा मात्र परस्पर विरोधी गटातील अनेकांनी महिलावर्गावर अक्षरशः अत्याचार करून मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. याची अजिबात दखल पोलिसांनी घेतलेली नाही. यामुळे आता हे प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल त्याचप्रमाणे महिला आयोगाकडे नेणार असल्याचा इशारा गायत्री गावस व त्याच्या परिवाराने दिलेला आहे. ज्यांनी मारहाण केलेली आहे त्यामध्ये अनेकजण सरकारी नोकर आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल व त्यासाठी आपण गप्प बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्यांना जबर मारहाण झालेली आहे त्यांना अटक करणे हे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या गृह खात्याला शोभते काय अशाप्रकारचा सवाल गायत्री गवस व त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे. ज्यापद्धतीने परस्परविरोधी गटाने कोयता दगड दंडुक्मयाने मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे असे असताना आमच्यावरच कारवाई करणे हे खरोखर अजब असल्याचा प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश द्यावेत व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सदर कुटुंबीयांनी केली आहे.

Related Stories

खनिज ‘डंप’ हाताळणीस न्यायालयाची मान्यता

Omkar B

नेपाळातील टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी कांपालवर

Amit Kulkarni

भर दिवसा बंगला फोडून 13 लाखांचा ऐवज पळविला

Patil_p

वाहतूक कार्यालये, ढाबे ‘स्कॅनर’खाली येणे गरजेचे

Omkar B

आरोग्य खात्यातील नोकर भरतीबाबत चौकशी व्हावी

Amit Kulkarni

व्यर्थ न ठरो हे बलिदान…

Omkar B