Tarun Bharat

जमैका तलावाजच्या प्रशिक्षकवर्गात चंदपॉल, ऍम्ब्रोस दाखल

Advertisements

वृत्तसंस्था/ किंग्जस्टन

विंडीजमध्ये 2022 साली खेळविल्या जाणाऱया कॅरेबियन प्रिमियर लिग टी-20 (सीपीएल) स्पर्धेत सहभागी होणाऱया जमैका तलावाज संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी विंडीजचा माजी क्रिकेटपटू शिवनरेन चंद्रपॉलची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विंडीजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टली ऍम्ब्रोस या संघाचा गोलंदाज प्रशिक्षक राहील.

विंडीजच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये शिवनरेन चंद्रपॉलने आपल्या 1994 ते 2015 या कालावधीतील कारकीर्दीत 164 कसोटीत तसेच 264 वनडे आणि 22 टी-20 सामन्यात 20 हजारपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. जमैका तलावाज संघाचे रिफेर हे यापूर्वीचे प्रमुख प्रशिक्षक होते. पण विंडीजच्या 19 वर्षांखालील युवा संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी रिफेर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना जमैका तलावाज संघाला निरोप द्यावा लागला आहे. रिफेरच्या जागी आता शिवनरेन चंद्रपॉल हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहतील.

जमैका तलावाज संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी माजी वेगवान गोलंदाज कर्टली ऍम्ब्रोसची नियुक्ती करण्यात आली आहे. 58 वषीय ऍम्ब्रोसने 1988 ते 2000 या बारा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये कसोटीत 405 बळी नोंदविले असून वन डेत त्याने 225 गडी बाद केले आहेत. कॅरेबियन प्रिमियर लिग स्पर्धेत गेल्या वषी सहा संघांचा समावेश होता. जमैका तलावाज संघाला या स्पर्धेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

Related Stories

अल्टिमेट खो खो स्पर्धेत ओडिशा जगरनट्स संघाला विजेतेपद

Patil_p

ऍशेस मालिकेतील तिसरी कसोटी उद्यापासून

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघ पराभूत

Patil_p

विश्व सांघिक टेनिस स्पर्धेला प्रारंभ

Patil_p

भारतीय मिश्र रिले संघाला रौप्य ऐवजी सुवर्णपदक

Patil_p

हॉटेल रुमच्या ‘त्या’ वादात तथ्य नाही

Patil_p
error: Content is protected !!