Tarun Bharat

जम्मूमध्ये पाडले पाकिस्तानी ड्रोन

वृत्तसंस्था/ कठुआ

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे बीएसएफने पाकिस्तानचे एक ड्रोन पाडले. या ड्रोनमध्ये मोठय़ा प्रमाणात हत्यारे पाठवण्यात आली होती. बीएसएफच्या जम्मूचे आयजी एन. एस. जामवाल यांनी ही माहिती दिली. या हत्यारांच्या माध्यमातून मोठा घातपाताचा कट आखला होता. मात्र तो उधळला असल्याचे ते म्हणाले.

जामवाल यांनी सांगितले की, पानसरमध्ये बीएसएफच्या गस्ती पथकाला हेक्साकॉप्टर भारतीय हद्दीमध्ये उड्डाण करताना दिसले. पथकातील जवानांनी गोळीबार करुन ते पाडले. सावधानतेने त्याची तपासणी केली असता त्यामध्ये हत्यारांचा मोठा साठा असल्याचे दिसून आले. अमेरिकी बनावटीच्या चार ऑटोमॅटिक कारबाईन्स, 60 राऊंड, 2 मॅग्जीन, सात ग्रेनेड अशी हत्यारे सापडली आहेत. या कॉप्टरचे वजन 17 ते 18 किलो तर हत्यारांचे वजन साडेपाच किलो होते. मात्र ही हत्यारे पाहिली असताना एखादा मोठा कट दहशतवादी संघटनांनी रचला असावा आणि त्यांच्या भारतातील एजंटांसाठी ही हत्यारे पाठवली गेली असावीत, यात कोणतीही शंका नाही. हे ड्रोन पाकिस्तानकडून आले होते, असेही त्यांनी सांगितले. मात्र सीमेपलीकडील दहशतवादी संघटनांना आणि शत्रूचे नापाक इरादे बीएसएफने हाणून पाडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याआधी जम्मू क्षेत्रात बीएसएफने हत्यारे आणि स्फोटके वाहून नेणारे ड्रोन पाडले आहेत. केंद्रशासित प्रदेशात हत्यारांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न वारंवार हाणून पाडला आहे. तरीही त्यांचे प्रयत्न सुरुच असतात. शनिवारी सकाळीही भारतीय हवाई हद्दीत घुसलेले हे ड्रोन बीएसएफ जवानांनी पंसार चौकी क्षेत्रात गोळीबारा करुन पाडले, असे जामवाल म्हणाले. हे ड्रोन पंसार चौकीसमोरील पाकिस्तानच्या रेंजरकडून नियंत्रित केले जात असावे. सात छोटे बॉम्ब, अत्याधुनिक रायफल्स त्यांच्या एजंटांसाठी पाठवल्या होत्या. ही हत्यारे कुठे जाणार होती, याचाही लवकरच तपास लागेल, असेही जामवाल म्हणाले.

Related Stories

अयोध्येत महिला बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, IPS अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

शेतकरी घरी परतल्याच्या अफवा; मागण्या मान्य होईपर्यंत कुठेही जाणार नाही

datta jadhav

देशात 44,111 नवे बाधित

datta jadhav

जयवीर शेरगिल यांचा काँग्रेसला रामराम

Patil_p

राजकीय मतभेद टाळणे आवश्यक

Patil_p

फिनलंडला रशियाकडून सैन्य कारवाईची धमकी

Patil_p