ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :
जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. बादीपोरा हे भूकंपाचे केंद्र होते.


मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
याआधी 21 डिसेंबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये सकाळी 8.33 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता 3.7 इतकी होती.