Tarun Bharat

जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा ग्रेनेड हल्ला; २ जवानांसह ५ जण जखमी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधल्या रैनावाडी भागात बुधवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. एका चेक पॉईंटवर दहशतवाद्यांनी हा ग्रेनेड हल्ला केलाय. यात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलीस दलाचा प्रत्येकी 1 जवान जखमी झालाय. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आलीय. श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांनी या घटनेला दुजोरा दिलाय.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया सतत वाढत आहेत. दहशतवादी भारतीय सैनिकांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष करत आहेत. तर सातत्याने हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैनिकांनी कम्बर कसली आहे. गेली अनेक दिवस जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत. दररोज दहशतवाद्यांविरोधात कारवाया सुरु आहेत. तर या कारवाईत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहेत.

Related Stories

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करणार?

datta jadhav

लस पुरविण्यास असमर्थ, सीरमचे 3 देशांना पत्र

datta jadhav

स्पुटनिक लस भारतात पोहचली; पुढील आठवड्यापासून होणार बाजारात उपलब्ध

Abhijeet Shinde

तामिळनाडू : कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना 5 लाख रुपयांची मदत

Rohan_P

उत्तर प्रदेशात महिलांच्या नाईट शिफ्टला बाय-बाय

Patil_p

Kolhapur; चुकीची माहिती देऊन छत्रपती घराण्याचा अवमान करू नका- संजय राऊत

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!