Tarun Bharat

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

Advertisements

जम्मू-काश्मीर/प्रतिनिधी

जम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले असून दोन पायलट जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शिवगढ धार भागात ही घटना घडली असून हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट असल्याची माहिती मिळत आहे. उधमपूर परिसरात जास्त धुक्यामुळे परिसरातील दृश्यमानता कमी झाली आहे, ज्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस बचावकार्यासाठी दाखल झाले.

दरम्यान, आर्मी एव्हिएशन हेलिकॉप्टर पाटनीटॉपजवळ उतरवले. यामध्ये दोन वैमानिक जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. तसेच अधिक तपशील तपासला जात आहे, असे भारतीय लष्कराने सांगितले आहे.

उधमपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक सुलेमान चौधरी यांनी सांगितले की, पोलिसांना हेलिकॉप्टर कोसळ्याची माहिती मिळाली आणि शिवगड धारमध्ये घटनास्थळाकडे पथके रवाना करण्यात आली आहेत. या भागात धुक्याचं प्रमाण जास्त असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून दोन जखमी लष्करी जवानांना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.

Related Stories

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीस सुरुवात

datta jadhav

देशात मृतांचा आकडा 400 च्या खाली

Patil_p

दहावी परीक्षेला ‘सर्वोच्च’ हिरवा कंदील

Patil_p

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

भारतीय मुलीला जागतिक पुरस्कार

Patil_p

बिहार : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!