Tarun Bharat

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर


श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवार दि. 4 जानेवारी 2022 रोजी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

दहशतवाद्यांबद्दल सुगावा लागल्यानंतर सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यातील ओके गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. जी चकमकीत बदलली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलांसोबत झालेल्या या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, मारले गेलेले दोघे स्थानिक होते आणि ते एलईटीशी संबंधित होते. अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

पठाणकोटमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली; BSF जवानांकडून गोळीबार

datta jadhav

तृणमूलचे 21 नेते माझ्या संपर्कात!

Patil_p

म्हैसूर प्राणी संग्रहालय, पॅलेस शनिवार-रविवार पर्यटकांसाठी बंद

Archana Banage

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक

datta jadhav

सांबा सेक्टरमध्ये तीन घुसखोर ठार; 36 किलो हेरॉईन जप्त

datta jadhav

तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्याला अटक

Patil_p