Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था

नागरीकांच्या हत्यांमुळे निर्णय, एका पोलिसाचाही मृत्यू

श्रीनगर/ वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली आहे. मंगळवारी श्रीनगरमध्ये एका सेल्समनची दहशतवाद्यांनी हत्या केली. तसेच एका निःशस्त्र पोलिसालाही जवळून गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली. या घटनांनंतर राजधानी श्रीनगर आणि संपूर्ण केंद्रशासित प्रदेशातच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अनेक संवेदनशील भागांमध्ये अधिक सैनिक नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

श्रीनगरमध्ये प्रत्येक कानाकोपऱयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम वेगाने सुरु आहे. बाटामालो भागात मंगळवारी या हत्या घडल्या आहेत. त्या भागात जास्त गस्त घालण्यात येत आहे. वाहनांची अचानक तपासणी करण्यात येत आहे. अन्य राज्यांमधून काश्मीरमध्ये नोकरी आणि व्यवसायांसाठी आलेल्या नागरीकांना विशेष सुरक्षा देण्यासाठी नवी योजना आखण्यात येत आहे. तसेच हत्या केलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

दहशतवाद्यांनी निःशस्त्र किंवा कामावर नसलेल्या पोलिसांना लक्ष्य बनविण्यात सुरवात पेली आहे. त्यामुळे अशा पोलिसांना संरक्षण देण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय अर्धसैनिक दलांचे 5 हजार सैनिक अतिरिक्तरित्या नियुक्त करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा व्यवस्थेची माहिती मागविली असून ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत. त्यांनी अनेक महत्वपूर्ण सूचना प्रशासनाला केल्या असून त्यानुसार सर्वत्र केंद्रीय अर्धसैनिक दलांच्या 5 हजार अतिरिक्त सैनिकांपैकी 3 हजारांची नियुक्ती श्रीनगरमध्ये करण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये दहशतवाद्यांचा प्रभाव आहे, तेथे अधिक सुरक्षा देण्यात आली आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

दहशतवाद्यांशी संबंधित पाच सरकारी कर्मचारी बडतर्फ

datta jadhav

आनंद सुब्रम्हण्यम यांना सीबीआयकडून अटक

Patil_p

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा कपात

Patil_p

गुजरातमधील राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

पंजाबमध्ये 200 किलो अंमली पदार्थ जप्त

Patil_p

माजी केंद्रीय मंत्री शांति भूषण यांचे निधन

Patil_p