Tarun Bharat

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर

Advertisements

ऑनलाईन टीम / जम्मू : 


देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासात 751 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 14 हजार 650 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 240 आणि काश्मीरमधील 511 जणांचा समावेश आहे. सध्या एकूण 14650 रुग्णांपैकी 6112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1207 आणि काश्मीरमधील 4915 जण आहेत. 


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 8274 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1800 रुग्ण जम्मूतील तर 6474 जण काश्मीरमधील आहेत. 


तर आतापर्यंत 254 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 20 जण तर काश्मीरमधील 234 जणांनी आपला जीव गमावला आहे. 
आतापर्यंत 3 लाख 31 हजार 954 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 37 हजार 885 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 6 हजार 122 लोक हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात आहेत. 

Related Stories

देशात 7 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

देशात कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 439, तर 377 बळी

prashant_c

कोरोनाची धास्ती : मध्य प्रदेश सरकारची नवी नियमावली जाहीर

Rohan_P

‘सीआयएससीई’ बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर

Patil_p

रामायण एक्स्प्रेसमधील गणवेशावरून वाद

Patil_p

Congress presidential election : कॉंग्रेसच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी 96 टक्के मतदान

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!