Tarun Bharat

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 17,920 वर

ऑनलाईन टीम / जम्मू : 


देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीर मध्ये गेल्या चोवीस तासात 615 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 17 हजार 920 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 136 आणि काश्मीर मधील 479 जणांचा समावेश आहे. सध्या एकूण 17920 रुग्णांपैकी 7680 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1741 आणि काश्मीरमधील 5939 जण आहेत.

 
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 9928 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2008 रुग्ण जम्मूतील तर 7920 जण काश्मीरमधील आहेत. तर आतापर्यंत 312 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 29 जण तर काश्मीरमधील 289 जणांनी आपला जीव गमावला आहे. 


आतापर्यंत 3 लाख 54 हजार 869 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 44 हजार 429 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 7 हजार 680 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत. 

Related Stories

सावधान! आता माणसांनाही होतोय ‘बर्ड फ्लू’

datta jadhav

पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजार रुपये दागिने लंपास

Abhijeet Khandekar

जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण आग

Archana Banage

केरळची पुनरावृत्ती; कोल्ह्याला खायला घातले स्फोटके भरलेले मांस

datta jadhav

ममतांच्या ‘भवानीपूर’मध्ये 30 रोजी पोटनिवडणूक

Patil_p

विक्रमी! देशात 24 तासात 3.86 लाख नवे रुग्ण

datta jadhav