Tarun Bharat

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 1,617 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1,617 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 47 हजार 542 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 894 आणि काश्मीर मधील 723 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 12 हजार 839 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 6,608 आणि काश्मीरमधील 6,231 जण आहेत. 
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 33 हजार 871 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 7366 रुग्ण जम्मूतील तर 26,505 जण काश्मीरमधील आहेत. 


तर आतापर्यंत 832 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 123 जण तर काश्मीरमधील 709 जणांनी आपला जीव गमावला आहे. 


आतापर्यंत 5 लाख 02 हजार 377 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 44 हजार 532 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 12 हजार 839 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत. 

Related Stories

हजारो वर्षांपासून भारत-श्रीलंकेचे संबंध

Patil_p

पूर्वा निकम हिचे सेमीनारमध्ये यश

Patil_p

राज्यात 300 हून अधिक ब्लॅक फंगसचे रुग्ण

Patil_p

भारत-चीन सीमेवर अतिरिक्त सैनिक तुकडय़ा

Patil_p

समीर वानखेडे यांच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट

Patil_p

चिंता वाढली : उत्तर प्रदेशात एका दिवसात 6,692 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar