Tarun Bharat

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 557 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 557 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 91 हजार 321 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 213 आणि काश्मीर मधील 364 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 680 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • दिवसभरात 733 रुग्ण कोरोनामुक्त!


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 733 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 82,219 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 33,573 रुग्ण जम्मूतील तर 48,646 जण काश्मीरमधील आहेत. 


तर आतापर्यंत 1430 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 475 जण तर काश्मीरमधील 955 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

खरा इतिहास शिकवलाच गेला नाही !

Patil_p

सुरक्षा दलांनी उधळला हल्ल्याचा कट

Patil_p

तीन दहशतवाद्यांना शोपियानमध्ये अटक

Patil_p

देशात कोरोना रुग्ण 50 लाखांच्या पार

Patil_p

आसाम- मेघालय सीमेवरील गोळीबारात वनरक्षकासह ६ ठार

Abhijeet Khandekar

यंदा देशात सरासरीच्या 98 टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Archana Banage