Tarun Bharat

जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 428 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासात 428 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 33 हजार 075 वर पोहोचली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 154 आणि काश्मीर मधील 274 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 246 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1530 आणि काश्मीरमधील 5716 जण आहेत. 


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 25 हजार 205 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 5697 रुग्ण जम्मूतील तर 19508 जण काश्मीरमधील आहेत. 


तर आतापर्यंत 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 47 जण तर काश्मीरमधील 577 जणांनी आपला जीव गमावला आहे. 


आतापर्यंत 4 लाख 35 हजार 205 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 43 हजार 158 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 7 हजार 246 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत. 

Related Stories

सोमवारी पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Patil_p

कोरोना व्हायरसमुळे केरळमध्ये ‘राज्य आपत्ती’ घोषित

prashant_c

कोविड गाशा गुंडाळतोय?

Patil_p

हाथरस बलात्कार हत्या प्रकरण उच्च न्यायालयाकडे

Patil_p

फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे समन्स

Patil_p

फसव्या निर्यातदारांशी संबंधित 56 कस्टम ब्रोकरचे परवाने निलंबित

datta jadhav