ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 454 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 678 वर पोहोचली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 217 आणि काश्मीर मधील 237 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 4 हजार 908 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 503 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,04,068 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 41,696 रुग्ण जम्मूतील तर 62, 372 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1702 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 595 जण तर काश्मीरमधील 1107 जणांनी आपला जीव गमावला आहे.