- ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 हजारांच्या उंबरठ्यावर
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 3, 848 नवे रुग्ण आढळून आले. तर 43 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 63 हजार 905 वर पोहोचली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 1442 आणि काश्मीर मधील 2406 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 49,893 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 4466 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 2 लाख 10 हजार 547 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 79,912 रुग्ण जम्मूतील तर 1,30, 635 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 3465 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 1639 जण तर काश्मीरमधील 1826 जणांनी आपला जीव गमावला आहे.