Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

Advertisements

दिल्लीत एकाला पकडले, मोठे कारस्थान उघडकीस

जम्मू  / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे एका चकमकीत भारतीय सैनिकांनी पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या संघर्षात पाच सैनिक हुतात्मा झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर मंगळवारी देण्यात आले. मृत दहशतवाद्यांजवळचा मोठा शस्त्रसाठा हाती लागला असून त्यात एके 47 रायफलींचा समावेश आहे. दुसऱया घटनेत दिल्लीत एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून दिल्लीत हिंसाचार माजविण्याचे मोठे कारस्थान उघड झाले.

मंगळवारी ठार झालेल्या 5 दहशतवाद्यांपैकी 3 जण रेजिस्टन्स प्रंट या संघटनेचे आहेत. ही पाकपुरस्कृत संघटना आहे. याच संघटनेने गेल्या काही दिवसात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या 5 नागरीकांच्या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली होती. हे दहशतवादी शोपियानमध्ये एका बहुमजली इमारतीत दडून बसले होते. या इमारतींवर हल्ला करुन सैनिकांनी त्यांना ठार केले. अशा आणखी दोन इमारतींना सैनिकांनी वेढले असून अद्यापही संघर्ष सुरू असल्याचे वृत्त आहे.

एकाची ओळख पटली

मारल्या गेलेल्या दशहतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव मुख्तार शहा असे असून तो गांदरबाल येथे राहणारा आहे. त्याने गेल्या आठवडय़ात वीरेंद्र पासवास या बिहारी फेरीवाल्याची हत्या केली होती. त्यानंतर तो शोपियान येथे पळून गेला होता. त्याला टिपण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी दोन इमारती जमीनदोस्त केल्या असून त्या दहशतवाद्यांनी आश्रयस्थान म्हणून उपयोगात आणल्या होत्या. या घटनेनंतर काही मिनिटांमध्येच आणखी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.

पीर पंजाल येथे चकमक

जम्मू भागातील पीर पंजाल येथे गेले दोन दिवस चकमक सुरु असून सोमवारपासून मंगळवार संध्याकाळपर्यंत पाच सैनिक हुतात्मा झाले आहेत, तर सात दशहतवाद्यांना मारण्यात आले आहे. पाच विभिन्न एन्काऊंटर्समध्ये हे दहशतवादी मारले गेले आहेत. या संपूर्ण भागात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

सर्व ठिकाणी प्रथम दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला होता. त्यानंतर सैनिकांनी  त्याला चोख प्रत्युत्तर दिले. सोमवारी अशाच संघर्षात 5 सैनिक हुतात्मा झाले होते.  ती धक्कादायक घटना होती. त्यानंतर सैनिकांची उपस्थिती वाढविण्यात आली. अधिक बळ उपयोगात आणून दहशतवाद्यांना घेरण्यात आले व त्यांची कोंडी करुन त्यांच्यापैकी अनेकांना ठार करण्यात आले. अद्यापही काही दहशतवादी आसपासच्या भागांमध्ये लपले असून त्यांना टिपण्यासाठी अभियान सुरु आहे.  

दिल्लीत मोठा कट उधळला

दसरा, दिवाळी आणि सणासुदीच्या काळात दिल्लीत स्फोटमालिका घडवून आणून मोठा हिंसाचार माजविण्याचा कट दिल्ली पोलीसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरातील रमेश पार्क भागात एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक एके 47 रायफल, एक मॅक्झिन, 60 गोळय़ा आणि एक हातबाँब अशी साधने हस्तगत करण्यात आली आहेत. हा दहशतवादी बनावट ओळखपत्र घेऊन वावरत होता.

ओळख पटवली

दिल्लीत अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव अशरफ अली असून तो पाकचा नागरीक आहे, अशी माहिती मिळाली आहे. तो नाव बदलून अली मोहम्मद नूर या नावाने रहात होता. त्याला पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने प्रशिक्षण दिल्याचेही तपासात उघड झाले. तीन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांना गुप्तचरांनी सावध केले होते. त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोठय़ा हिंसाचाराच्या कटाची माहिती मिळविण्यात आली आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी यासंदर्भात दिल्लीच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱयांची बैठकही घेतली होती. या दहशतवाद्याला अटक केल्याने आणखी बरीच माहिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुरक्षा व्यवस्था सतर्क

ड जम्मू-काश्मीर आणि दिल्लीत दशहतवाद्यांच्या हालचाली वाढल्याचे स्पष्ट

ड गुप्तचर विभागाचा दक्षतेचा इशारा, सीमेवर सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ

ड शोपियानसह आणखी दोन स्थानी दहशतवाद्यांशी संघर्ष अद्यापही सुरुच

ड दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज, गस्त, पहारा वाढविला

Related Stories

राजस्थान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला

Patil_p

बेंगळूरमध्ये आणखी तिघांना कोरोना

tarunbharat

आजच्या चर्चेपूर्वी शेतकरी आक्रमक

Patil_p

कोझीकोड विमान अपघात चालकाच्या चुकीमुळे

Patil_p

राजोरीत दहशतवाद्यांच्या गटाला घेरले

datta jadhav

सीमेपासून लढाऊ विमाने दूर ठेवा!

Patil_p
error: Content is protected !!