Tarun Bharat

जम्मू काश्मीरमध्ये 875 रुग्णांवर उपचार सुरू 

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 104 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 26 हजार 693 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 17 आणि काश्मीर मधील 87 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 875 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 49 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,23,860 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 51,117 रुग्ण जम्मूतील तर 72,743 जण काश्मीरमधील आहेत.  

तर आतापर्यंत 1958 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 725 जण तर काश्मीरमधील 1233 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

विविध शहरांमध्ये मेट्रो लाईनचा विस्तार

Patil_p

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून दिल्ली प्रदूषणावर चर्चा; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

Abhijeet Khandekar

दिल्ली : 4,853 नवे कोरोना रुग्ण; 44 मृत्यू

Tousif Mujawar

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या 10-12 वीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत

Tousif Mujawar

अंतराळविरांसाठी ‘मेनू’ तयार

Patil_p

तुर्की बचावकार्यातील दोन पथके मायदेशी

Patil_p