Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये LPG चा साठा करण्याचे आदेश

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरमध्ये किमान 2 महिने पुरेल एवढा LPG गॅस सिलेंडरचा साठा करण्याचे आदेश जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मु यांनी राज्याच्या संबंधित प्रसासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. 

मागील काही दिवसांपासून देशात भूकंप होत आहेत. अशा परिस्थितीत जमीन खचल्यामुळे महत्त्वाचा रस्ता बंद पडल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मु यांनी बैठक घेतली. या बैठकीत 2 महिने पुरेल एवढा LPG गॅस सिलेंडरचा साठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच जवानांसाठी शाळा उपलब्ध करण्याच्या सूचना कारगिल जवळच्या गांदरबल जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. मात्र, LPG गॅस सिलेंडरचा साठा करण्याच्या आदेशाला काहीही राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.

Related Stories

‘हिजाब’वर सर्वोच्च न्यायालयाचा खंडित निर्णय

Amit Kulkarni

भाजपचे हिंदुत्व केवळ राजकीय स्वार्थासाठी

Kalyani Amanagi

तुझे खेळ बंद कर नाहीतर, पळताभुई थोडी होईल; क्षीरसागरांचा इंगवलेंना इशारा

Archana Banage

हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मंजूर,जाणून घ्या महत्त्वाच्या तरतूदी

Archana Banage

भारतात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गेल्या 24 तासात 16,922 नवे रुग्ण

Tousif Mujawar

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करणार?

datta jadhav