Tarun Bharat

जम्मू काश्मीर : नगरोटामध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

Advertisements

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या भागात जवानांकडून शोध कार्य सुरू आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील नगरोटामध्ये गुरुवारी पहाटे ही चकमक झाली. जम्मू श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटामधील बान परिसरात असलेल्या टोलनाक्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार सुरू झाला. 


याबाबत माहिती देताना जम्मूचे जिल्हा पोलीस प्रमुख एस एस पी श्रीधर पाटील यांनी सांगितले की, आज पहाटे 5 च्या सुमारास दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. हे दहशतवादी एका ट्रकमध्ये लपून बसले होते. त्यानंतर ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. जवानांकडून शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी नगरोटा येथील राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. 

Related Stories

108 वर्षांनी काशीमध्ये विराजमान माता अन्नपूर्णा

Patil_p

पंजाबमध्ये सर्वांना मोफत उपचाराची सुविधा

Amit Kulkarni

पुलवामा चकमकीत सोलापूरचे सुनील काळे शहीद

datta jadhav

ब्रिटनच्या मरेची विजयी सलामी

Patil_p

घाऊक महागाई दरात मोठी वाढ

Patil_p

ऑस्करच्या अंतिम शर्यतीत ‘राइटिंग विद फायर’

Patil_p
error: Content is protected !!