Tarun Bharat

जम्मू काश्मीर : बस स्टँडवर ग्रेनेड स्फोट, 7 जखमी

प्रतिनिधी / श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील त्राल मुख्य बसस्थानकावर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यात 7 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांनी हा हल्ला ग्रेनेडने केला आहे. यामध्ये ग्रेनेडचा हवेतच स्फोट घडवून आणला आहे. मात्र झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. या हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच हा परिसर रिकामा केला असून शोध सुरू आहे. त्रालच्या बस स्थानकानजीक ग्रेनेडची पिन सापडली असल्याने हा स्फोट ग्रेनेडमुळे झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.

Related Stories

देशात 36,469 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

आव्हाड, यशोमती ठाकूरनंतर आता काॅंग्रेसचा मुनगंटीवारांच्या मतदानावर आक्षेप

Abhijeet Khandekar

ममतांच्या सल्लागारावर कारवाईची तयारी

Amit Kulkarni

प्रशांत किशोरांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांचे सल्लागार पद सोडलं

Archana Banage

चार्ल्स शोभराज पकड मोहिमेत सिंधू पुत्राचाही होता सहभाग

Anuja Kudatarkar

कोरोनाच्या स्वदेशनिर्मित नस्यलसीला मान्यता

Patil_p