Tarun Bharat

जम्मू-काश्मीर : सरकारी रुग्णालयातील इंटरनेट सेवा सुरू

 ऑनलाईन टीम / पुणे :

जम्मू-काश्मीरमधील सरकारी रुग्णालयांमध्ये मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली ब्रॉडबँड सेवा मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्व मोबाईलवरील एसएमएस सेवाही नव्या वर्षात सुरू झाली आहे. प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी ही माहिती दिली.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्यात आल्यानंतर काश्मीर खोऱयात सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली इंटरनेट आणि लँडलाईन सुविधा हळूहळू सुरू करण्यात आली. सरकारी रुग्णालयांमधील ब्राँडबॅन्ड सेवा आणि सर्वच मोबाईलवरील एसएमएस सेवा मागील पाच महिन्यांपासून बंद होती.

बंदीच्या काही दिवसांनंतर ही सेवा हळूहळू सुरू करण्यात आली होती. सुरूवातील लँडलाईन आणि त्यानंतर पोस्टपेड मोबाईल सेवेला सुरूवात करण्यात आली होती. मंगळवारी मध्यरात्रीपासून सरकारी रुग्णालयातील ब्रॉडबॅन्ड आणि मोबाईलवरील एसएमएस सेवा सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

‘लष्कर-ए-तोयबा’च्या मॉड्य़ूलचा पर्दाफाश

Amit Kulkarni

कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस

Patil_p

देशभरात लस पोहचविण्यासाठी विमानतळांवर तयारी सुरू

datta jadhav

तेल उत्पादनात स्वयंपूर्णतेची पंतप्रधानांची शेतकऱ्यांना हाक

Patil_p

‘किसान सन्मान’चा हप्ता आज शेतकऱयांच्या खात्यात

Patil_p

24 तासात दीड लाखांहून अधिक रुग्ण

Patil_p